Mumbai Pune Expressway Waterlogging Pudhari
पुणे

Mumbai Pune Expressway: मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर पावसाचे पाणी; कामशेत परिसरात दोन मार्गिका पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे वाहतूक मंदावली; वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील कामशेत परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजून २० मिनिटांच्या सुमारास तीन मार्गिकांच्या महामार्गापैकी तब्बल दोन मार्गिका पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता.

पावसाचा जोर आणि रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे प्रमाण इतके मोठे होते की, रस्त्याच्या कडेला असलेला दुभाजकही अनेक ठिकाणी पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. त्यामुळे महामार्गावरील वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढत पुढे जावे लागत होते.

तीन मार्गिकांचा प्रशस्त रस्ता असूनही दोन मार्गिका मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेल्याने वाहनांची गती लक्षणीयरीत्या कमी झाली. काही वाहनचालकांनी तुलनेने कमी पाणी असलेल्या मार्गिकेतून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण झाल्याचे चित्र होते.

दरम्यान, द्रुतगती महामार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मुसळधार पावसाच्या काळात महामार्गावरील सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पाण्याचा निचरा सुरळीत करण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT