Pune Heavy Rain 2026: पुणे जिल्ह्यात विक्रमी पाऊस; चिंचवडमध्ये 200 मिमी, लोणावळ्यात 670 मिमी पावसाची नोंद

शिवाजीनगरसह शहरात वाहतूक कोंडी, घाटमाथ्यावर अतिवृष्टी; अनेक भागांत पूरस्थिती आणि झाडपडीमुळे नुकसान
Rain
Maharashtra RainDeepal Salvi| Pudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे,पिंपरी चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून संततधार सुरू असून रविवारी विक्रमी पावसाची नोंद झाली . रविवारी रात्री पावसाने संपूर्ण जिल्हा जलमय झाला. चिंचवड भागात 200 मी पाऊस झाल्याने त्या ठिकाणी घरात पाणी गेले.

Rain
Pune Vegetable Market Prices: पुणे मार्केट यार्डात पावसाचा फटका; आवक घटली, टोमॅटो-फ्लॉवरसह भाज्या महागल्या

शिवाजीनगरात सरासरी 116 मिनी पावसाची नोंद झाल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. जिल्ह्यात बहुतांश भागात ७० ते १०० मीमी तर काही भागात अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे, एकूणच गेल्या पाच दिवसात महिना भराचा पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे, मात्र शहरात आणि ग्रामीण भागात झाडपडीने यंदा मोठे नुकसान केले आहे.

Rain
Pune Fruit Market Prices: पुणे फळबाजारात पपईच्या दरात वाढ; कलिंगड, खरबूज, जांभळे आणि लिंबू स्वस्त

घाट माथ्यावर 24 तासात झालेला विक्रमी पाऊस (मिमी)

  • लोणावळा:670

  • भिरा:609

  • ताम्हिणी:580

  • शिरगाव:540

  • आंबोणे:537

  • खोपोली:516

  • कुंडले:290

  • भिवपुरी:266

  • खंड:305

  • निलशी:275

  • ठाकूरवाडी:115

  • वांगाव:207

  • कोयना:161

  • धारावी:125

  • शिरवटा:219

  • वलवण:442

  • लोणावळा:495

  • डोंगरवाडी:451

  • दावडी:474

  • मुळशी:230

  • पोफळी:190

Rain
Pune Market Yard Jaggery Prices: पुणे मार्केट यार्डात गूळ, साखर आणि शेंगदाणे महागले; वारीपूर्वी किराणा बाजारात तेजीची चिन्हे

पुणे जिल्हा :24 तासातील पाऊस (मिमी)

  • निमगिरी:१२१.५

  • माळीण:६३.५

  • भोर:५५.५

  • दापोडी:४३.५

  • राजगुरूनगर:४२.५

  • डुडूळगाव:३९

  • नारायणगाव:30

  • शिरूर:२२.५

  • लवळे:१५.५

  • हवेली:१४.५

  • तळेगाव:३.५

  • बारामती:३.४

  • दौंड:२.५

Rain
Chakan Onion Prices: चाकण बाजार समितीत कांद्याच्या भावात वाढ; हिरवी मिरची, टोमॅटोची मोठी आवक

शहरात रविवारी रात्रीतून झालेला विक्रमी पाऊस (मिमी)

  • शिवाजीनगर:१०८.४

  • पाषाण:११३

  • लोहगाव:१४६.८

  • चिंचवड:२०६.५

  • एनडीए:९८.५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news