पुणे

Mumbai Market Committee : मुंंबई बाजार समितीच्या सचिवपदी डॉ. पी.एल. खंडागळे 

अमृता चौगुले
पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या सहकार विभागाचे अपर निबंधक आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांची मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदी बदली करण्याचा निर्णय शासनाने शासनाने घेतला आहे. सध्याचे मुंबई बाजार समितीचे सचिव आर.एम. भुसारी यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या सचिव पदावर खंडागळे यांची बदली करण्याचे आदेश सहकार विभागाचे सह सचिव सं.पु. खोरगडे यांनी 15 सप्टेंबर रोजी जारी केले आहेत.
संबंधित बातम्या :
 राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिवपदासह डॉ. खंडागळे यांनी यापुर्वी  सहकार आयुक्तालयातील अपर निबंधक (पतसंस्था), पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, आयुक्तालयात अपर निबंधक (गृहनिर्माण), अपर आयुक्त व विशेष निबंधक आणि  अपर निबंधक (लेखापरिक्षण) या पदावरही काम केलेले आहे. प्राधिकरणाच्या सचिव पदाच्या त्यांच्या कारकिर्दीत राज्यातील सुमारे 260 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका एकावेळी व यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या. त्यानुसार सोमवारी सचिव पदाचा पदभार घेणार असल्याचे खंडागळे यांनी सांगितले.  तर निवडणूक प्राधिकरणाच्या सचिव पदाचा अतिरिक्त पदभार सह सहकारी निवडणूक आयुक्त वसंत पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT