पौड : मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीन जागांपैकी दोन जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार)ने विजय मिळविला. एका जागेवर भाजपचा उमेदवार विजयी झाला. पंचायत समितीत सहापैकी तीन जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार)ला, तर दोन जागा राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाल्या. भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले.
मुळशी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पौड-अबंडवेट जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिलिंद नंदकुमार वाळंज हे ५२९७ मतांनी विजयी झाले. त्यांनी शिवसेना (उबाठा) उमेदवार अविनाश बलकवडे यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद वाळंज यांना १७,९५९, तर शिवसेनेचे अविनाश बलकवडे यांना १२,६६२ मते मिळाली.
पौड पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काजल अंकुश मोरे या विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोमल वाशिवले यांचा २१४५ मतांनी पराभव केला. काजल मोरे यांना ६१४७ मते मिळाली, तर कोमल वाशिवले यांना ४००२ मते मिळाली. अबंडवेट पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण धनवे यांनी शिवसेना (उबाठा) उमेदवार सचिन खैरे यांचा १७७६ मतांनी पराभव केला. प्रवीण धनवे यांना ८५४७ मते मिळाली, तर सचिन खैरे यांना ६७७१ मते मिळाली.
माण-हिंजवडी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे शिवाजी बुचडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर साखरे यांचा १९६७ मतांनी पराभव केला. शिवाजी बुचडे यांना १७,९०५ मते मिळाली, तर सागर साखरे यांना १५,९३८ मते मिळाली.
माण पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मंदा शेळके यांनी भाजपा पुरस्कृत उमेदवार रूपाली बोडके यांचा २३१० मतांनी पराभव केला. मंदा शेळके यांना ५९८१ मते मिळाली, तर रूपाली बोडके यांना ३६७१ मते मिळाली. हिंजवडी पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीच्या ऐश्वर्या वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकीता वाघमारे यांचा १३२२ मतांनी पराभव केला. ऐश्वर्या वाघमारे यांना १०१२१ मते मिळाली, तर निकिता वाघमारे यांना ८७९९ मते मिळाली.
पिरंगुट-भूगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार शांताराम इंगवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महादेव कोंढरे यांचा १३८४ मतांनी पराभव केला. शांताराम इंगवले यांना ११,१४१ मते मिळाली, तर महादेव कोंढरे यांना ९,७५७ मते मिळाली.
पिरंगुट पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल पवळे यांनी शिवसेना (उबाठा) उमेदवार रामदास गोळे यांचा ३६३ मतांनी पराभव केला. राहुल पवळे यांना ३७४१ मते मिळाली, तर रामदास गोळे यांना ३३७८ मते मिळाली. भूगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दगडूकाका करंजावणे यांनी शिवसेना (उबाठा) उमेदवार अनिल पवार यांचा ४३८ मतांनी पराभव केला. दगडूकाका करंजावणे यांना ६७३२ मते मिळाली, तर अनिल पवार यांना ६२९४ मते मिळाली.