पुणे

पुणे : ‘अंशदायी’ला अभय, मुखर्जी योजना थंड

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून शहरी गरीब योजना तसेच अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजना मात्र अजून बासनातच गुंडाळून ठेवल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीलाही विलंब होत असल्याने महापालिकेने शहरातील ज्येष्ठांना दुर्लक्षित केले आहे.
महापालिका हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच वर्षांपूर्वी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी मोफत आरोग्य योजना सुरु करण्यात आली.

मात्र, नवीन आर्थिक वर्षात या योजनेसाठी तरतूदच करण्यात आलेली नाही. गेल्या चार महिन्यांमध्ये योजना सुरू करण्याबाबत महापालिकेला अनेकांकडून सातत्याने विचारणा होत आहे. दुसरीकडे, शहरी गरीब योजना आणि अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेसाठी मात्र मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. महापालिकेच्या माजी कर्मचार्‍यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीला प्राधान्या द्यावे, असे आरोग्य हक्क कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आता ही योजना सर्व ज्येष्ठ नागरिकांना न देता आर्थिकदृष्ट्या मागास व्यक्तींना देण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेचे फलकही अद्याप 'जैसे थे' आहेत.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजना आर्थिकदृष्टया मागास ज्येष्ठ नागरिकांना देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र, शहरी गरीब तसेच अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजना बंद करण्याबाबत कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.

– रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT