पुणे

इंदापूर तालुक्यातील कुरवली येथे चारहून अधिक दुकाने जळून खाक

अमृता चौगुले

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील कुरवली गावामध्ये रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत चारहून अधिक दुकाने जळून खाक झाली आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक दुकानासह फर्निचर, दुचाकीचे गॅरेज व इतर दुकाने अक्षरशा जळून खाक झाली आहेत. गावातील मुख्य पेठेतील व्यापारी पेठेत अनेक दुकानास ही आग लागल्याने याची दाहकता मोठी होती. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून आगीचा वेग इतका होता की दोन दुचाकींचा यामध्ये स्फोट देखील झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.

दरम्यान गावकऱ्यांनी आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला तसेच बाजूच्या दुकानातील सामान बाहेर काढल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. दरम्यान अग्निशामक बंबाला रात्री उशिरा ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने या आगीत कोणतेही जीवितहानी झालेली नाही.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT