Terirost Attak On Karachi Police Headquarters : पाकिस्तानच्या कराची शहरातील पोलिस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला | पुढारी

Terirost Attak On Karachi Police Headquarters : पाकिस्तानच्या कराची शहरातील पोलिस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला

कराची; पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानमधील कराची शहरातील पोलिस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या बातमीनुसार पोलिस मुख्यालयात ८ ते १० सशस्त्र दहशतवादी असल्याची माहिती समोर येत आहे. हा हल्ला झाल्यानंतर पोलिस आणि दहशतवाद्यांच्यात गोळीबार सुरु आहे. अद्याप दोन्हीकडून गोळीबार सुरु असून या चकमकीत दोन आतंकवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. (Terirost Attak On Karachi Police Headquarters)

शुक्रवारी (दि.१७) कराची पोलिस मुख्यालयात सशस्त्र ८ ते १० दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. चार मजली पोलिस मुख्यालयात जेव्हा दहशतवादी दाखल झाले तेव्हा मुख्यालयात पोलिसांसह काही अधिकारी उपस्थित होते. दहशतवादी कार्यालयात शिरताच त्यांनी सर्व लाईट्स बंद केले. यानंतर पोलिस आणि दहशतवाद्यांच्या चकमक उडाली. (Terirost Attak On Karachi Police Headquarters)

दहशतवाद्यांनी आधी मुख्यालय परिसरात अर्धा डझनहून अधिक हातबॉम्बचे गोळे फेकले आणि मुख्यालय परिसर तसेच इमारतीमध्ये प्रवेश केला. अर्धसैनिक बल, पोलिस आणि दहशतवाद्यांच्यात अद्यापही भीषण गोळीबार सुरु आहे. हा हल्ला झाल्यानंतर आसपासच्या परिसरातील पोलिस बल कराचीच्या पोलिस मुख्यालयात दाखल झाली आहे. कराची पोलिस प्रमुखांचे कार्यालय शहराच्या मुख्य मार्गावरच असून हा महामार्ग विमानतळाला जावून जोडतो.


अधिक वाचा :

Back to top button