पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून भंगार व्यावसायिकाचे चिखली येथून अपहरण केले. त्यानंतर चर्होली येथे नेऊन व्यावसायिकाच्या डोक्यात हातोड्याने घाव घालून त्याचा खून केला. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 28) सायंकाळी घडली.
सिराज खान (40, रा. कुदळवाडी, चिखली), असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी निजाम हसन खान (42, रा. कुर्ला वेस्ट, मुंबई) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सफीउद्दिन खान (40, रा. कुदळवाडी, चिखली), अनिस (रा. मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी यांचा भाऊ सिराज खान याचे आरोपींसोबत मागील दीड महिन्यापूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी गुरुवारी (दि. 28) सिराज खान यांचे कुदळवाडी, चिखली येथून अपहरण केले. त्यानंतर सिराज खान यांना चर्होली येथील अरणेश्वर टेकडीच्या पायथ्याला निर्जन स्थळी नेले. तेथे सिराज यांच्या डोक्यात आणि तोंडावर हातोडीचे घाव घालून त्यांचा खून केला. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा