पुणे

मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार; राज्यात ‘या’ भागात अवकाळी पावसासह उष्णतेची लाट

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अनुकूल स्थितीमुळे मान्सूनची आगेकूच वेगाने सुरू आहे. तो 48 तासांत अरबी समुद्राच्या आग्नेय भागात दाखल होईल. दरम्यान, राज्यात 24 मेपर्यंत अवकाळी पाऊस आणि तीव्र उष्णतेची लाट, तर कोकणात उष्ण व दमट वातावरण राहील, असा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. मंगळवारी राजधानी दिल्लीत हंगामातील सर्वोच्च 47.6 अंश तापमानाची, तर राज्यात जळगाव येथे 43.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

मान्सूनचा वेग ताशी 30 ते 40 वरून आता 40 ते 50 कि.मी. इतका झाला आहे. सोमवारीच तो अरबी समुद्राच्या दिशेने निघाला आहे. बराचसा भाग काबीज करीत केवळ 48 तासांत तो अरबी समुद्राच्या आग्नेय भागात दाखल होईल. त्यामुळे केरळात तो लवकर येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याबरोबरच मान्सूनने मंगळवारी मालदीव, कोमोरीन, बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग आणि अंदमान-निकोबार बेटांपर्यंत प्रगती केली आहे.

मराठवाड्यावर चक्रीय स्थिती

हरियाणा ते मराठवाडा भागावर चक्रीय स्थिती असून, ती मध्य प्रदेश पार करून
पुढे गेली आहे. त्यामुळे राज्यात उष्णतेच्या लाटेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 24 मेपर्यंत राहील तसेच कोकणात उष्ण व दमट वातावरणाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

  • राज्यात 24 मेपर्यंत उष्णतेची लाट आणि वळीव पाऊस
  • उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट; जळगाव 43.9 अंशांवर
  • दिल्ली 47.6 अंश; हंगामातील सर्वोच्च तापमान

हेही वाचा

SCROLL FOR NEXT