पुणे : हवेचे दाब वाढताच वेगाने घोडदौड करणारा मान्सून गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या मध्य भागावरच अडखळला आहे. राज्यासह देशातील पाऊस कमी होत असून, 6 जूनपर्यंत कुठेही मोठ्या पावसाचा अंदाज नाही.
मान्सून गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर भागातच थांबला आहे. कडक उन्हामुळे अवकाळीने भिजलेली जमीन कोरडी होत असून, वाफसा येण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे.
शुक्रवारी बांगलादेश किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पूर्वोत्तर भारतात पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, त्याचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही, असे चित्र आहे. सध्या कोकण वगळता राज्यातील सर्वच भागांतून पाऊस पूर्ण कमी झाला आहे.