पुणे : सलग पाचव्या दिवशी रविवारी (दि.1 जून) मान्सून मुंबई, पुणे, अहिल्यानगर शहरातच मुक्कामी होता. त्याने पुढे प्रगती केली नाही. मात्र, स्थानिक वातावरणात झालेल्या बदलामुळे काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडला. दरम्यान, 3 ते 5 जून या कालावधीत विदर्भातच पावसाचा जोर राहिल. 6 जूनपासून राज्यातून पावसाचा जोर पूर्ण कमी होत आहे.
राज्यात मान्सूनची प्रगती 28 मेपासून खोळंबली आहे. हवेचे दाब अचानक 998 वरून 1005 हेक्टा पास्कल इतके वाढल्याने मान्सूनच्या वाऱ्यांना ब्रेक लागला अन् तो मुंबई, पुणे, अहिल्यानगर भागातच अडखळून बसला आहे. ही स्थिती 6 जूनपर्यंत राहिल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ज्ञांनी दिला आहे.
दरम्यान, ईशान्य भारतात मान्सून बंगालच्या उपसागरातून दुसऱ्या शाखेने पोहोचला असून तेथे जोरदार प्रगती करत आहे. त्या भागात मेमध्ये पाऊस खूप कमी होता. मात्र, गत 24 तासांत आसाम आणि मेघालय राज्यांत सुमारे 420 मि. मी.पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
ठाणे (5), रत्नागिरी (2), सिंधुदुर्ग (2, 3), धुळे (4,5), नंदुरबार (4), जळगाव (4,5), नाशिक (5), छत्रपती संभाजीनगर (5), अकोला (4,5), अमरावती (2), भंडारा (3 ते 5), बुलडाणा (4,5), चंद्रपूर (4,5), गडचिरोली (2 ते 5), गोंदिया (3 ते 5), नागपूर (4,5), वर्धा (2 ते 5), वाशिम (4,5), यवतमाळ (2 ते 5).
आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू. गत 24 तासांत 420 मि.मी.ची नोंद
त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, केरळ, ओडिशा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी मुसळधार सुरू
हरियाणा आणि पंजाबमध्ये काही ठिकाणी 70 ते 90 कि.मी. प्रतितास वेगाने वादळी वारे
पश्चिम राजस्थानात 2 ते 4 जूनदरम्यान धुळीच्या वादळाची शक्यता
केरळ, कर्नाटकात 1 ते 4 जूनदरम्यान वादळी वारे
6 ते 7 जूनदरम्यान देशभरातील पाऊस कमी होणार