Pune–Dubai Flights Cancelled Pudhari
पुणे

Pune–Dubai Flights Cancelled: मध्यपूर्वेत तणाव वाढला! पुण्यातून दुबईला जाणारी उड्डाणे रद्द, प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना

Middle East Airspace Closure: पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे दुबई आणि अबू धाबी परिसरातील हवाई क्षेत्र तात्पुरते बंद करण्यात आले आहे. इराणच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

Rahul Shelke

Middle East Airspace Closure Pune Dubai Flights Cancelled 2026:

पश्चिम आशियात पुन्हा एकदा तणाव वाढला असून त्याचा थेट फटका आता विमान वाहतुकीला बसू लागला आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर हल्ला केला. त्यानंतर इराणने प्रत्युत्तरादाखल इस्रायलसह पर्शियन गल्फमधील काही देशांना लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे.

विशेषतः संयुक्त अरब अमिराती मधील दुबई आणि अबू धाबी येथील महत्त्वाच्या विमानतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर त्या परिसरातील हवाई क्षेत्र तात्पुरते बंद करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द किंवा वळवण्यात आली आहेत. नागरी विमान वाहतुकीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

पुणे–दुबई–अबू धाबी उड्डाणांवर परिणाम

या वाढत्या तणावाचा परिणाम महाराष्ट्रातील प्रवाशांवरही झाला आहे. पुण्याहून दुबई आणि अबू धाबीला जाणारी काही महत्त्वाची उड्डाणे ३ मार्च २०२६ रोजी रद्द करण्यात आली आहेत.

खालील उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत:

❌ SG ५१/५२ – पुणे–दुबई–पुणे
निर्गमन: २०:३० वा. | आगमन: ०४:५५ वा. (०४/०३/२०२६)

❌ 6E १४८४/१४८३ – दुबई–पुणे–दुबई
आगमन: २२:३० वा. | निर्गमन: ००:३० वा. (०४/०३/२०२६)

❌ IX २८३/२८४ – अबू धाबी–पुणे–अबू धाबी
निर्गमन: २०:४० वा. | आगमन: ०४:१५ वा. (०४/०३/२०२६)

प्रवाशांनी पुनर्बुकिंग व पुढील माहितीसाठी संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे. अचानक उड्डाणे रद्द झाल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

या उड्डाणांमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. विशेषतः नोकरी, व्यवसाय किंवा कुटुंबीयांच्या भेटीसाठी गल्फ देशांत जाणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात असतात. अचानक उड्डाणे रद्द झाल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

हवाई क्षेत्र का बंद आहेत?

हवाई हल्ल्यांनंतर संबंधित देशांनी सुरक्षेच्या दृष्टीने काही काळासाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे. क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नागरी विमानांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलली जात आहेत. विमान कंपन्यांनाही अशा परिस्थितीत विमाने सुरक्षित मार्गाने वळवावी लागतात किंवा उड्डाणे थांबवावी लागतात. यामुळे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत होते.

प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना

रद्द झालेल्या उड्डाणांबाबत प्रवाशांनी संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधून पुनर्बुकिंग किंवा परताव्याबाबत माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक कंपन्या पर्यायी उड्डाणे किंवा नवीन तारीख देत आहेत.

प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी आपले उड्डाणाची स्थिती (Flight Status) ऑनलाइन तपासावी. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी अधिकृत वेबसाइट किंवा ग्राहक सेवा क्रमांकावरूनच माहिती घ्यावी.

पश्चिम आशियातील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. हा संघर्ष अधिक वाढला, तर आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतातून गल्फ देशांकडे दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे परिस्थिती स्थिर होईपर्यंत उड्डाणांमध्ये बदल, उशीर किंवा रद्द होण्याची शक्यता आहे. सध्या तरी प्रवाशांनी संयम बाळगून अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT