Mayuri Kokate Victory Pudhari
पुणे

Mayuri Kokate Victory: पाषाण–सुस प्रभागात मयुरी कोकाटे यांचा दणदणीत विजय; 100 दिवसांचा विकास आराखडा जाहीर

प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपच्या मयुरी कोकाटेंना 34,154 मतांची आघाडी; मूलभूत सुविधा व पाषाण तलाव पुनरुज्जीवनावर भर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: घरी राजकीय वारसा असला, तरी मला स्वत: सामाजकार्याची आवड होती. पती राहुल कोकाटे यांना त्यांच्या समाजकार्यात मदत करीत राहिले. बोलण्याची आवड असल्याने लोकांशी जुळवून घेण्यात यशस्वी झाले. 2012 मध्ये पहिली महापालिका निवडणूक लढवली.

पण, अपयश आले. मात्र, हताश न होता मी काम करीत राहिले. महिलांसाठी बचत गट, भजनी मंडळे काढली. अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला. आमच्या कामाची दखल घेत पक्षाने पुन्हा संधी दिली. या संधीचे सोने करीत मी जिंकले. 100 दिवसांचा प्लॅन तयार करून प्रभागाच्या विकासाला सुरुवात करणार असल्याचा संकल्प नगरसेविका मयूरी कोकाटे यांनी व्यक्त केला.

राज्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या प्रभाग क्रमांक 9 पाषाण, सुस, बाणेर, म्हाळुंगे मतदारसंघातून दोन भाजपचे, तर दोन राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपच्या मयूरी कोकाटे या ‌‘क‌’ गटातून 34 हजार 154 मते मिळवून विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग््रेासच्या पार्वती निम्हण यांचा पराभव केला. मयूरी कोकाटे यांचे पती राहुल कोकाटे हे भाजपचे प्रभागातील नेते असून, त्यांचे मोठे कार्य आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देखील मोठे काम केले आहे. 2007 पासून सातत्याने या भागात ते राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत.

मयूरी कोकाटे यांचे राहुल कोकाटे यांच्याशी 2006 मध्ये लग्न झाल्यावर त्यांनी देखील राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचे शिक्षण बी. कॉम. झाले आहे. मयूरी यांचे आजोबा उरुळी कांचन येथे कॉंग््रेासचे नेते होते. त्यामुळे राजकीय वारसा त्यांना होताच. सासरी आल्यावर देखील त्यांनी राजकारण जवळून अनुभवले. नगरिकांपर्यंत जाण्यासाठी, तसेच महिलांसाठी त्यांनी भजनी मंडळाची स्थापना केली. पुढे त्यांनी 50 महिला बचत गटांची स्थापना केली. या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. 2012 ला निवडणूक लढली. त्यात काही मतांनी पराभव झाला. मात्र, 2025-26 च्या निवडणुकीत त्यांना मतदारांनी पसंती देत भरघोस मते देऊन विजयी केले.

प्रभागात करणार ही कामे

  • प्रभागात मूलभूत सुविधांचा विकास करणार. यात प्रामुख्याने रस्ते, पाणी आणि प्रभागाच्या स्वच्छतेवर भर देणार

  • 100 दिवसांचा मास्टर प्लॅन तयार करून विकासकामांची सुरुवात करणार

  • पाषाण तलावाचा डीपीआर तयार करून त्याला त्याचे जुने वैभव परत करून देणार

  • सुस, म्हाळुंगे, पाषाण, बाणेर येथे रेन वॉटर हारवेस्टींगसाठी रोडमॅप तयार करणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT