पुणे

Maratha Reservation : हर्षवर्धन पाटील यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

Laxman Dhenge

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षण मिळावे यासाठी मागणी केली. पाटील यांच्यासह भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे, भाजपा कोअर कमिटीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन पाटील यांनी आंदोलकांमध्ये येऊन उन्हात बसत मागणीला पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभाग नोंदवला.

माजी मंत्री पाटील यांनी आंदोलकांची भेट घेत मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी आपला पाठिंबा दर्शवला तसेच धनगर समाज, लिंगायत समाज व ज्या समाजाच्या आरक्षणाबद्दल मागणी आहे, त्यांना आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत बोलणे झाल्याचेही पाटील यांनी सांगितले. या वेळी पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील व कन्या तसेच भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी सर्व आंदोलकांचे औक्षण केले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT