चार टाईमबॉम्ब बनवण्यासाठी पैसे देणार्‍या वृद्धेस अटक | पुढारी

चार टाईमबॉम्ब बनवण्यासाठी पैसे देणार्‍या वृद्धेस अटक

आग्रा ः वृत्तसंस्था :  दंगल झालीच तर स्वसरंक्षणासाठी हाती असावेत यासाठी चक्क चार टाईमबॉम्ब बनवून घेण्यासाठी पैसे देणार्‍या एका 60 वर्षीय वृद्ध महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. 10 वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीत घर जाळले गेल्यापासून आपल्या सुरक्षेबाबत ही महिला अस्वस्थ होती, त्यातूनच तिने हा उपद्व्याप केल्याचे समोर आले आहे.

संबंधित बातम्या 

इम्राना बेगम असे या महिलेचे नाव आहे. तिने जावेद नावाच्या एका व्यक्तीला चार टाईम बॉम्ब बनवून देण्यासाठी 10 हजार रुपये अ‍ॅडव्हान्स दिले होते. चौकशीदरम्यान इम्रानाने सांगितले की, 2013 मध्ये मुझफ्फरनगर येथे झालेल्या दंगलीत तिचे घर जाळण्यात आले होते.

जर पुन्हा दंगली झाल्या तर संरक्षण करण्यासाठी हाताशी बॉम्ब असावेत म्हणून तिने तिच्याच एका मैत्रिणीच्या मुलाला म्हणजे जावेद याला हे बॉम्ब बनवण्याचे काम सोपवले. त्याला स्फोटकांचा अनुभव असल्याने त्यानेही हे काम स्वीकारले. इम्रानाने त्याला या कामासाठी 10 हजार रु. अ‍ॅडव्हान्सही दिले. जावेदने यू ट्यूबच्या मदतीने टायमर वापरून चार बॉम्बही तयार केले होते. गुरुवारी मुझफ्फरनगरच्या काली नदी परिसरात उत्तर प्रदेश पोलिसांच्या टास्क फोर्सने त्याला अटक केली. त्यानंतर त्याच्याकडून इम्रानाची माहिती मिळाली. तिला शामली येथून अटक करण्यात आली.

Back to top button