पुणे

Maratha Reservation : ओबीसीमधून मराठा आरक्षण शक्य : हरिभाऊ राठोड

Laxman Dhenge

पुणे : ओबीसीमधूनच हे आरक्षण देणे शक्य असून मराठा, कुणबी व लेवा पाटील यांना स्वतंत्र, माळी-तेली-भंडारी व आगरी यांना वेगळा भाग व बारा बलुतेदारांना वेगळा भाग, असा फार्म्युला राज्य सरकारने स्वीकारल्यास सर्वांनाच आरक्षण मिळू शकते. राजकीय आरक्षणासंदर्भातही हाच फार्म्युला लागू करणे शक्य असून, त्यातून सर्वांना प्रतिनिधित्व मिळू शकते, असे प्रतिपादन ओबीसी नेते व माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केले. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राठोड म्हणाले, राज्य सरकारच्या निर्णयप्रक्रियेत भुजबळ यांचा समावेश असतानाही बाहेर येऊन ते यू टर्न घेतात, असा आरोपी त्यांनी या वेळी केला. सध्याच्या मराठा व ओबीसी समाजातील आंदोलनाचे भुजबळ हेच आता केंद्रबिंदू असून, मराठा आरक्षणाला विरोध करणे त्यांच्या अंगलट येईल. त्यामुळे भुजबळ यांनी आता राजीनामा देऊन घरी बसावे. भुजबळ यांनी पाठिंबा दिल्यास मराठा आरक्षणाचा तिढा आठ दिवसांत सुटेल.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT