पुणे

Pune News : पुण्यात तब्बल आठ इमारतींवर हातोडा

अमृता चौगुले

धायरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : हिंगणे खुर्द परिसरातील खोराड वस्ती येथील बीडीपी आरक्षित जागेवर अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या व बांधकाम सुरू असलेल्या आठ इमारती गुरुवारी पाडण्यात आल्या. बांधकाम विभाग झोन क्रमांक दोनच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. परिसरातील सर्व्हे नंबर पाचमध्ये डोंगराच्या कडेला खोराड वस्तीमधील बीडीपी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना महापालिका प्रशासनाने नोटीस दिली होत्या. तरीही या इमारतींचे बांधकाम सुरू होते.

यामुळे बांधकाम विभागाने जॉ कटर, जेसीबी, दोन ब्रेकर, दहा बिगारींच्या साहाय्याने या इमारतींवर कारवाई केली. या वेळी सुमारे 30 हजार स्क्वेअर फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. बीडीपी क्षेत्रातील फ्लॅट किंवा इमारती नागरिकांनी खरेदी करू नये, तसेच या क्षेत्रात कोणीही अनधिकृत बांधकामे करू नये; अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT