Manodhairya scheme pudhari
पुणे

Manodhairya scheme: शासनाच्या ‘ मनोधैर्य ’ मुळे ‘ त्या ’ होताहेत स्वावलंबी! गेल्या तीन वर्षात 6 हजार 353 जणींना मिळाला आधार

बहुतेक जणी विविध कौशल्य आत्मसात करून ‘ स्वावलंबी’ झाल्या आहेत

पुढारी वृत्तसेवा
  • पीडीतांना किमान दहा लाख रूपयांपर्यत अर्थसहाय्य

  • किमान कौशल्याच्या माध्यमातून वेगवेगळे कोर्सच्या सहकार्याने स्वत:च्या पायावर उभे राहण्यास सहकार्य

शिवाजी शिंदे

पुणे : राज्यात बलात्कार, बालकांवर होत असलेले लैंगिक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला, तसेच ज्वालाग्राही, ज्वलनशील पदार्थामुळे नाहक बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य तसेच पुर्नवसन करून त्यांना जीवनात पुन्हा उभा करण्यासाठी राज्य शासनाने ‘मनोधैर्य’ योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे राज्यात तीन वर्षात 6 हजार 353 पीडीतांना जिंदगीत उभारी मिळाली आहेच शिवाय या पैकी बहुतेक जणी विविध कौशल्य आत्मसात करून ‘ स्वावलंबी’ झाल्या आहेत.

एखादी महिला अगर वयात आलेले बालक,बालिका यांना समाजभान येण्यापूर्वीच समाजविघातकांकडून त्यांच्या मनावर आघात करतात. त्यामुळे त्या जीवनात एकदमच कोलमडूनच पडतात. त्यांना जीवन जगणे नकोसे वाटते. काही जणी तर जीवन संपविण्याचाच प्रयत्न करतात. मात्र त्यांना या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी अनेक सामाजिक संस्था प्रयत्न करीत असतात. त्यांसाठी पीडीतेचे समुपदेशन करणे,आघात करणा-यांवर पोलिसांचे सहकार्य घेऊन त्यांना शिक्षा सुनावणे,यासह यंत्रणाचा वापर करण्यात येतो.ज्यामुळे पीडीतेस जगण्याची जाणीव निर्माण व्हावी.

यासाठीच राज्य शासनाने महिला आणि बालकल्याण विभागाच्या सहकार्याने बलात्कार, बालकांवर होणारे लैगिक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला, ज्वालाग्राही, ज्वलनशील पदार्थ (पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाकाचा गॅस तसेच इतर ज्वलशील पदार्थ ) यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालक,बालिका यांना अर्थसहाय्य तसेच पुनर्वसन करण्यासाठी सन 2013 पासून ‘मनोधैर्य योजना ’ सुरू केली आहे. मात्र त्यामध्ये काळानुसार बदल करून नवीन मनोधैर्य योजना सुरू केली आहे.

या नवीन योजनेनुसार या पीडीतांना किमान दहा लाख रूपयांपर्यत अर्थसहाय्य देण्यात येतेच शिवाय ‘ त्या ’ जीवनात स्वत:च्या पायावर उभे राहावीत यासाठी किमान कौशल्याच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्याची सोय उपलब्ध देण्यात आली आहे. या योजनेमुळे पीडीत असलेल्या महिला आणि बालक, बालिकांचे मनोधैर्य वाढण्यास मदत होत आहे.

मनोधैर्य योजनेमुळे असे मिळतेय पीडीतांना सहकार्य

वर्ष -बलात्कार-पास्को-अ‍ॅसिडहल्ला-अनै.व्यापार-एकूण

2022-23--310--1038--10---2-----1360

2023-24--374--1501--44--1----1920

2024-25--7710--2297---5--0---3073

-------------------------------

एकूण -- 1455---- 4836--- 59--3-- 6353

------------------------------

या घटनामध्ये होत आहे वाढ

  • गेल्या तीन वर्षात राज्यात बालकांवरील अत्याचारात सर्वाधिक वाढ झाली आहे. त्याचा आकडा 4836

  • गेल्य तीन वर्षात बलात्काराच्या घटनामध्ये वाढ झाली. असल्याचे दिसून आले आहे. त्याचा आकडा 1455 असा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT