Mandar Kiwale Attack Case Pudhari
पुणे

Mandar Kiwale Attack Case: दोन गुंठे जागेचा वाद; शुभमच्या खुनापर्यंत अमर साकोरे पहिले टार्गेट, हाती लागला मंदार किवळे

शिवाजीनगर न्यायालयाबाहेर मंदार किवळेवर झालेल्या हल्ल्यामागे कात्रजमधील दोन गुंठे जागेचा वाद आणि शुभम चव्हाण प्रकरणाची पार्श्वभूमी असल्याचे तपासात समोर आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: संतोषनगर कात्रज भागातील दोन गुंठे जागेचा वाद शुभम चव्हाणच्या खुनापर्यंत पोहोचला. मंदार किवळे, अमर साकोरे आणि त्यांच्या साथीदारांनी हा खून केला होता. त्याच खुनाचा बदला घेण्यासाठी किवळेवर खुनी हल्ला करण्यात आला. परंतु, किवळे थोडक्यात बचावला. त्याची तब्येत चिंताजनक असून, ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणाला एप्रिल २०२५ मध्ये घडलेल्या घटनेची किनार आहे. शुभम आणि अक्षय चव्हाण यांच्या कुटुंबीयांची संतोषनगर कात्रज भागात दोन गुंठे जागा आहे. ती चुलते अमोल चव्हाण यांनी २०२१ मध्ये विकत घेतल्याचे सांगितले जाते.

त्या जागेवर ७ एप्रिल २०२५ रोजी कोणीतरी योगेश दत्तात्रय निंबाळकर नावाच्या मालकी हक्काचा बोर्ड लावला. ११ एप्रिल रोजी चव्हाण कुटुंबीयांनी तो बोर्ड काढून टाकला. १९ एप्रिल रोजी परत अमोल चव्हाण यांना समजले की त्यांच्या जागेत परत कोणीतरी पत्र्याचे शेड मारत आहे.

ते कल्याण ठाणे येथे होते. त्यांनी पोलिस मदतीसाठी ११२ ला कॉल करून त्यांचा भाऊ सुभाष यांना माहिती दिली. त्यांनी ते पत्र्याचे शेड काढून टाकले. त्या कारणातून अमर साकोरे आणि त्याच्या साथीदारांनी चव्हाण यांच्या घरी येऊन शिवीगाळ करत अमोल व शुभम कोठे आहेत. आमच्या जागेत येऊन आम्हाला नडतो काय असे म्हणून त्यांना जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.

त्या वेळी शुभम घरी नव्हता. पहाटे पावणेचार वाजताच्या सुमारास शुभम आणि साकोरे, किवळे यांच्यासोबत जागेच्या कारणातून वाद झाला. त्या वेळी आरोपींनी शुभमला लाकडी बांबू, स्टंपने बेदम मारहाण केली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते; परंतु डॉक्टारांनी त्याला मृत घोषित केले.

शुभमच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ अक्षय आणि साथीदार आरोपींची कारागृहातून बाहेर येण्याची वाट पाहात होते. त्यांना अगोदर साकोरेचा काटा काढायचा होता; परंतु त्याला अद्याप जामीन झालेला नाही. अशातच चार दिवसांपूर्वी किवळेचा जामीन झाल्याची माहिती त्यांना मिळाली होती.

तेव्हापासून ते त्याच्या मागावर होते. त्याचा शोध त्यांनी तो राहत असलेल्या परिसरातदेखील घेतला, मात्र तो काही हाती लागला नाही. अखेर बुधवारी तो त्यांना शिवाजीनर येथील न्यायालयाच्या बाहेर सापडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT