हनुमंत वाघले
नायगाव: माळशिरस-बेलसर जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग््रेास व राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाच्या दिग्गज नेत्यांमध्ये खरी लढत होणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व हवे, असे येथील जनमाणसाचे मत आहे. त्यामुळेच माळशिरस-बेलसर गटाचा शिलेदार कोण होणार याची उत्सुकता मतदारांना लागली आहे.
प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, लॉजिस्टिक पार्क, बुलेट ट्रेन असे अनेक विकासाभिमुख प्रकल्प याच माळशिरस-बेलसर जिल्हा परिषद गटात प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांना स्थानिक शेतकऱ्यांचा मात्र तीव विरोध आहे. मनमानी पद्धतीने लादले जाणारे हे प्रकल्प या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार आहे. यामुळे या प्रकारांच्या विरोधात व शेतकऱ्यांच्या बाजूने जो उमेदवार ठामपणे उभा राहील तोच या भागाचे प्रतिनिधित्व करेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.
त्याच बरोबर ‘बुडत्याला काठीचा आधार’ या म्हणीप्रमाणे सुरू असलेली पुरंदर उपसा सिंचन योजना, जनाई शिरसाइ जलसिंचन योजना, पारगाव-माळशिरस प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व शिवरी प्रादेशिक जलजीवन योजना या योजना पूर्ण क्षमतेने चालत नाहीत, असे एक ना अनेक गंभीर प्रश्न या भागातील शेतकरी मतदारांसमोर कायमच उभे असतात परिणामी आत्तापर्यंत स्थानिकांना अडीअडचणीत साथ देणारा व भविष्यात समस्या सोडविणारा उमेदवारच या भागाचा प्रतिनिधी असेल. राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाकडून दत्ता झुरंगे हे जिल्हा परिषदेचे प्रबळ उमेदवार समजले जातात. झुरंगे यांनी गतवेळच्या पंचवार्षिक निवडणुकीत या गटाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. प्रशासनाचा दांडगा अनुभव व मतदारसंघात चांगली पकड असल्याने या वेळी देखील त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल असे बोलले जाते.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व म्हाडाचे माजी उपाध्यक्ष विजयराव कोलते यांचे चिरंजीव गौरव कोलते हे राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. वडिलांचा यापूर्वीचा मतदारसंघातील घराघरातील नातेसंबंध, संपर्क व उच्चशिक्षित युवा तरुण गौरव कोलते यांचे युवकांशी असलेले मैत्रीचे संबंध यामुळे कोलते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माळशिरस गावचे माजी उपसरपंच व सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू तरुण माऊली यादव यांनी देखील जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविलेली आहे. माजी आमदार संजय जगताप यांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते म्हणून माऊली यादव यांची ओळख आहे. माळशिरस ग््राामपंचायतीमध्ये सध्या माऊली यादव यांची सत्ता असून त्यांच्या पत्नी आरती यादव या लोकनियुक्त सरपंच म्हणून कारभार पाहत आहेत. माळशिरस गणातील सर्वात मोठी ग््राामपंचायत माळशिरस असून परिसरात माऊली यादव यांचा चांगला संपर्क आहे. पूर्ण माळशिरस गणातून माऊली यादव हे एकमेव उमेदवार जिल्हापरिषदेला इच्छुक असल्याने या भागातून चांगले मतदान माऊली यादव घेतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे.
पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे खंदे समर्थक व जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य रमेश इंगळे हे देखील शिवसेना पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बेलसर गणात इंगळे यांची चांगली पकड आहे. बेलसर गणातील रहिवासी असलेले दत्ता झुरंगे, गौरव कोलते, रमेश इंगळे हे जिल्हा परिषदेसाठी आपले नशीब आजमावत आहेत तर माळशिरस गणातून केवळ माऊली यादव हे एकमेव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे सध्या तरी चित्र आहे.
पुरुष आणि महिला मतदार समसमान
माळशिरस-बेलसर गटातील जवळपास 27 गावे व वाड्या-वस्त्यांवरील एकूण 45 हजार मतदार या गटात असून महिला व पुरुष हे समसमान आहेत. सर्वसामान्य मतदार कोणाला कौल देणार यावर या जिल्हा परिषद गटाचा शिलेदार ठरणार आहे. सध्या तरी चौरंगी लढत या गटात पहावयास मिळत असून ऐनवेळी इतर गटातील उमेदवार देखील या गटात आपले नशीब आजमावू शकतात. ऐनवेळी कोणाला कोणत्या पक्षाकडून संधी मिळते यावरती या गटाचे चित्र स्पष्ट होईल.