पुणे

पुणे : माळशेज घाट उद्यापासून आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी बंद

Shambhuraj Pachindre

आळेफाटा; पुढारी वृत्तसेवा : माळशेज घाट हा मुंबईच्या नागरिकांना किंवा पुणे, अहमदनगर मधून जाणाऱ्या नागरिकांसाठी जवळचा मार्ग आहे. त्यामुळे माळशेज घाटातून अनेक प्रवाशी ये – जा करतात. मात्र आता कल्याण माळशेजमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण गुरुवार दि. १९ मे ते प्रत्येक गुरुवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ हा मार्ग रस्त्याच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दगड फोडण्यासाठी विस्फोटकांचा वापर करण्यात येणार असल्याने वाहतुकीत बदल देखील करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ मधील किमी ८४.००० ते १०१.००० पर्यंत दुहेरी कॉक्रिटीकरण करण्याचे काम सद्या जोरात सुरू आहे. पुणे जिल्यातील लांबी किमी १८.६०० ते १००.२८० रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी हा मार्ग बंद करण्यात येणार आहे. यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था देखील करण्यात आली आहे.पर्यायी वाहतुक व्यवस्था ही कल्याण- माळशेज घाट खुबी करंजाळे खिरेश्वर ते कोल्हेवाडी- सागनोरी ते पिंपळगाव जोगा ते भोईरवाडी ते कोळवाडी. ओतूर- आळेफाटा- अहमदनगर अशी असणार आहे. तसेच पर्यायी मार्गावर अवजड वाहनांवर बंदी असणार आहे. पुढील सूचना येईपर्यंत अशीच व्यवस्था असणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

माळशेज घाट हा नगर, नाशिक, पुणे कडील नागरिकांना जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. पावसाळ्याच्या अगोदर या मार्गावर रस्त्याची कामे सुरू करण्यात आली असून पावसाळा सुरू झाल्यानंतर कामे पूर्ण करण्याचे. प्रयत्न प्रशासनाचे आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून हा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी मुंबईकडे जाताना पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT