Sunetra Pawar Pudhari
पुणे

Malegaon Sugar Factory Chairman Election: माळेगाव साखर कारखाना: चेअरमनपदाची निवड पुढे ढकलली

सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य निवडीवर विराम; निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या प्रकृतीमुळे निर्णय लांबणीवर

पुढारी वृत्तसेवा

शिवनगर: बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदारची निवड पुढे ढकलण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे ते कारखाना कार्यस्थळावर येऊ शकले नाहीत त्यामुळे सदरची निवड पुढे ढकलण्यात आल्याचे रविवारी (दि.१) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले.

अजित दादा पवार यांच्या अचानक निधनामुळे चेअरमन पदाची जागा रिक्त झालेली होती अजितदादा माळेगाव कारखान्याची चेअरमन होते त्यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांची निवड करण्याचे जवळपास निश्चित झालेले होते. यासाठी अजितदादा पवार ज्या ब वर्ग गटातून कारखान्याचे संचालक झाले होते. त्या ब वर्ग गटातून सुनेत्रा पवार यांची कारखान्याच्या संचालकपदी यापूर्वीच निवड झालेली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुद्धा आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीला उपस्थित होत्या बैठक सुरू झाल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांची तब्येत बिघडल्याने ते उपस्थित राहू शकणार नाहीत असे सांगण्यात आल्याने चेअरमन पदाची निवड पुढे ढकलण्यात आली. यावेळी कारखान्याच्या उपाध्यक्षा संगीता कोकरे,ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक अशोक पाटील आदींसह बहुसंख्येने सभासद शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT