Teacher  Pudhari
पुणे

Maharashtra Teacher Training Schedule: शिक्षक प्रशिक्षणाचे नवे वेळापत्रक जाहीर; १० जुलैपर्यंत तालुकास्तरीय प्रशिक्षण पूर्ण होणार

जनगणना कामांमुळे पुढे ढकललेले प्रशिक्षण पुन्हा सुरू; इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या शिक्षकांसाठी विशेष नियोजन, १५ जूनपर्यंत प्रशिक्षकांचा तपशील सादर करण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शिक्षकांना दिलेल्या जनगणनेच्या कामांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या शिक्षक प्रशिक्षणाचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित केले असून, १० जुलैपर्यंत तालुकास्तरापर्यंतचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी यांनी प्रशिक्षण वेळापत्रकासह सूचनांचे परिपत्रक प्रसिद्ध केले. इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या शिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाले झाले आहे, तर सहावीच्या शिक्षकांचे प्रशिक्षण अद्याप बाकी आहे.

वेळापत्रकानुसार, सहावीच्या शिक्षकांसाठी १७ आणि १८ जून रोजी पूर्वतयारी कार्यशाळाही घेतली जाणार आहे. त्यानंतर चार दिवसांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण २२ ते २५ जूनदरम्यान होणार आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षण २९ जून ते २ जुलै, तर तालुकास्तरीय प्रशिक्षण ४ ते १० जुलैदरम्यान होणार आहे.

इयत्ता दुसरीचे तीन दिवसांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण १८ ते ३० जून, तीन दिवसांचे तालुकास्तर प्रशिक्षण २२ जून ते २ जुलै या कालावधीत होणार आहे. इयत्ता तिसरी आणि चौथी या इयत्तांच्या शिक्षकांसाठी १८ ते ३० जूनपर्यंत जिल्हास्तरीय, तर २४ जून ते ४ जुलैपर्यंत तालुकास्तरीय प्रशिक्षण होणार आहे.

तपशील १५ जूनपर्यंत अपेक्षित

इयत्ता सहावीच्या राज्यस्तरीय प्रशिक्षक प्रशिक्षणासाठी मराठी माध्यमचे २४४ आणि उर्दू माध्यमातील २४० प्रशिक्षक अपेक्षित आहेत. संबंधितांचा तपशील १५ जूनपर्यंत सादर करावा. प्रत्येक वर्गाच्या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यात कार्यरत विशेष शिक्षक, साधन व्यक्ती यांचाही समावेश करावा. जिल्ह्यांनी अनुभवी शिक्षक, व्याख्याते, पर्यवेक्षकीय अधिकारी आणि अभ्यासक्रम निर्मितीत सहभागी तज्ज्ञांचा समावेश करण्याबाबत स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT