Copy Pudhari
पुणे

Maharashtra SSC Exam Copy Cases: दहावीच्या पहिल्याच पेपरला 11 कॉपीप्रकरणे; पुणे विभागात सर्वाधिक प्रकार

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत सीसीटीव्हीमुळे गैरप्रकार तत्काळ उघड; इतर विभागांत शून्य प्रकरणे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आयोजित दहावीच्या पहिल्याच पेपरला राज्यभरात कॉपीच्या 11 घटना उघड झाल्या. यांपैकी 10 प्रकरणे पुणे विभागात, तर एक नागपूर विभागात आढळले. इतर विभागांत कॉपीचे प्रकार शून्य राहिल्याची माहिती मंडळाने परिपत्रकाद्वारे दिली.

शुक्रवारी सकाळच्या सत्रात दहावीचा मराठी विषयाचा पेपर झाला. त्याच वेळी ही प्रकरणे समोर आली. दुपारच्या सत्रातील परकीय भाषेच्या पेपरला एकही कॉपी झाली नाही. दरम्यान, बारावीच्या सकाळच्या सत्रातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयाचा पेपरही कोणत्याही गैरप्रकारांशिवाय पार पडला.

बहुतांश परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केल्याने यंदा कॉपीप्रकरणे तत्काळ उघडकीस येत असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात येत आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागाच्या माध्यमाद्वारे ही परीक्षा घेतली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT