Maharashtra Sahitya Parishad  Pudhari
पुणे

Maharashtra Sahitya Parishad Manifesto: परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा 16 कलमी जाहीरनामा जाहीर

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बळकटीकरणासह शंभरावे मराठी साहित्य संमेलन भव्य करण्याचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सर्व शाखा सक्षम व्हाव्यात, यासाठी त्यांना परिषदेच्या माध्यमातून आर्थिक मदत करणे, दर वर्षी पुण्यात फक्त मराठी पुस्तकांसाठीचा पुस्तक महोत्सव आयोजित करणे, परिषदेचे ग््रांथालय संकेतस्थळावर आणणे, महाराष्ट्र साहित्य पत्रिका डिजिटल स्वरूपात आजीव सभासदांना पाठवणे, असा परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा 16 कलमी जाहीरनामा शुक्रवारी (दि.6) प्रसिद्ध करण्यात आला. त्यात पुण्यात होणारे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भव्य आणि दिमाखदार करण्याचे आश्वासन आघाडीच्या उमेदवारांनी दिले आहे.

साहित्य संवर्धन आघाडीनंतर आता परिवर्तन उत्कर्ष आघाडीनेसुद्धा भविष्यातील योजनांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मराठी वाड्‌‍.मयाच्या इतिहासाच्या आठव्या खंडाच्या प्रकल्पास सुरुवात करणे, संशोधकांना एकत्र आणून महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प राबविणे, मराठीतील दर्जेदार साहित्यकृतींचा अन्य भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी स्वतंत्र अनुवाद विभाग सुरू करणे, अनुवादासाठीचे कौशल्य अभ्यासक्रम सुरू करणे, अनुवादासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा.

तसेच महत्त्वाच्या पुस्तकांसाठी दर वर्षी लेखकांचा सन्मान करणे, अमराठी नागरिकांसाठी सुलभ मराठीचे अभ्यास वर्ग सुरू करणे, महत्त्वाच्या समकालीन पुस्तकांवर चर्चेचे कार्यक्रम आयोजित करणे, इंग््राजी आणि मराठी माध्यमांच्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी मराठी भाषाविषयक उपक्रम राबविणे.

राज्यभर लेखन - वाचन आणि आस्वाद कार्यशाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी साहित्यातील विषयांवर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेणे, आजीव सभासदांचा स्नेहमेळावा दर वर्षी आयोजित करणे, अशा विविध मुद्द्‌‍यांचा समावेश जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.

समाजमनाची स्पंदने ओळखून कार्य करू

आमच्या परिवर्तन उत्कर्ष आघाडीने गेल्या दहा वर्षांत वास्तूच्या नूतनीकरणासह भाषेच्या संदर्भात ठाम भूमिका घेण्यापासून साहित्य परिषद साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख करण्यासाठी जे भरीव काम केले आहे ते लोकांसमोर आहे. तसेच, येत्या काळातसुद्धा समाजमनाची स्पंदने ओळखून कार्य करणार असल्याचे आघाडीचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT