पुणे : राज्यातील रब्बी हंगामातील पिकांखालील सरासरी क्षेत्र सुमारे 57 लाख हेक्टरच्या आसपास असून, यंदाच्या रब्बी हंगामात 65 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकांच्या पेरण्या अपेक्षित आहेत. सरासरी क्षेत्रापेक्षा सुमारे 10 लाख हेक्टरने पिकांच्या पेरण्या वाढण्याचा अंदाज आहे. त्यासाठी बी-बियाणे, खते आदी निविष्ठांच्या उपलब्धतेचे नियोजन कृषी विभागाने केले असून, हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.(Latest Pune News)
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत शुक्रवारी (दि. 17) त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या रब्बी हंगाम नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक झाली, त्यानंतर ते बोलत होते. बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालिका वर्षा लड्डा-उंटवाल, पोकरा प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक भुवनेश्वरी, कृषी संचालक रफिक नाईकवाडी, सुनील बोरकर, विनयकुमार आवटे, आदी उपस्थित होते.
महाडीबीटीवर 44 लाख 67 हजार शेतकऱ्यांची निवड
शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण
करण्याची कार्यवाही करा
उपलब्धता 14.58 लाख क्विंटल खतांची 31.35 लाख मे. टन पुरवठा मंजूर, उपलब्ध साठा 16.10 लाख मे. टन
केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून राज्यात युरियाची उपलब्धता वाढविणार
नाशिकचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांचा सत्कार कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाला. या वेळी परिमल सिंग, सुरज मांढरे, भरणे, विकासचंद्र रस्तोगी.