SSC and HSC Supplementary Exam Results
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलै 2025 मध्ये घेतलेल्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी (दि. 29) दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या hptt:///www. mahahsscboard.in या संकेत स्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी दिली आहे.
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची पुरवणी परीक्षा 24 जून ते 8 जुलैदरम्यान तर बारावीची पुरवणी परीक्षा 24 जून ते 16 जुलैदरम्यान घेण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 34 हजार 562 विद्यार्थ्यांमध्ये 24 हजार 245 मुले, 10 हजार 316 मुली, तर एका तृतीयपंथी विद्यार्थ्याचा समावेश आहे. (Latest Pune News)
तसेच बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 68 हजार 98 विद्यार्थ्यांपैकी 45 हजार 144 मुले, 22 हजार 953 मुली, एक तृतीयपंथी विद्यार्थी आहे. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी-पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारी 1 वाजल्यापासून संकेतस्थळावरून निकालाची प्रत डाऊनलोड करून त्याची प्रिंट घेता येईल. विद्यार्थ्यांना गुण पडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत व पुनर्मूल्यांकन या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील.
फेब्रुवारी-मार्च 2026, जून-जुलै 2026 आणि फेब्रुवारी-मार्च 2027 या तीन संधी उपलब्ध राहतील. फेब्रुवारी- मार्चमध्ये होणारी परीक्षा देऊ इच्छिणार्या नियमित, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र मिळालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधारअंतर्गत, तसेच आयटीआयद्वारे श्रेयांक हस्तांतरण घेणार्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन करता येणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दुपारी 1 वाजता ऑनलाइन होणार निकाल जाहीर
दहावीचा निकाल येथे पहा
बारावीचा निकाल येथे पहा