Suicide Pudhari
पुणे

Pune Crime: प्रेमप्रकरणातून 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या; प्रियकराला अटक

लोणीकंद परिसरातील घटना; दुसऱ्या तरुणीवरही गुन्हा, आरोपीला बीडमधून पोलिसांनी घेतले ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: प्रेमप्रकरणातून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणीकंद भागात नुकतीच घडली. तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांच्या विरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तरुणाला अटक केली आहे. तर, वैष्णवी चिखले (वय 19) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

याप्रकरणी सौरभ गंगाधर जगताप (वय 22, रा. रामनगर, पेरणे फाटा, अहिल्यानगर रस्ता) याला अटक केली असून, काजल संजय तिवारी (वय 19, रा. पेरणे फाटा, अहिल्यानगर रस्ता) हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काजल हिने देखील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली आहे. तिचे दोन्ही पाय फॅक्चर झाले आहेत.

याबाबत आत्महत्या केलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 2022 ते 17 जानेवारी 2026 दरम्यानच्या कालावधीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या तरुणीचे आरोपी सौरभ याच्याशी प्रेमसंबंध होते.

सौरभ याचे काजल तिवारी हिच्याशी प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय तरुणीला होता. या कारणावरून त्यांच्यात वाद झाले होते. आरोपींच्या त्रासामुळे तरुणीने जानेवारी महिन्यात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला.

तपासात आरोपींच्या त्रासामुळे मुलीने आत्महत्या केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. तर, काजल हिने देखील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली आहे. तिचे दोन्ही पाय फॅक्चर झाले आहेत. आरोपी सौरभ याला पोलिसांनी बीड येथून अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक विजया वंजारी पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT