लोणी भापकर: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील विमान अपघातप्रकरणी सखोल चौकशीची मागणी करीत बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे रविवारी (दि. 22) सकाळपासून गाव बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेतील सर्व दुकाने, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापने दिवसभर बंद ठेवण्यात आली.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असून, प्रसार माध्यमांतून वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संभमाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेतील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याबाबतही शंका उपस्थित केल्या जात असल्याने या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी ग््राामस्थांनी केली आहे.
लोणी भापकर ग््राामपंचायत, बलुतेदार संघटना आणि ग््राामस्थांच्या वतीने याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. लवकरात लवकर चौकशीचा अहवाल जाहीर न झाल्यास लोणी पाटी येथे मरास्ता रोकोफ आंदोलन करण्याचा इशाराही ग््राामस्थांनी दिला आहे. मुख्य चौकात गावातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील आजी-माजी पदाधिकारी, युवक व ग््राामस्थांनी एकत्र येत शांततेत बंद पाळण्यात आला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.