पुणे

LokSabha Elections 2024 | सुनेत्रा पवारांना एक संधी द्या, संधीचे सोने करू : जय पवार

Laxman Dhenge

भोर : पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून विकास झालेला आहे. अजित पवार सर्वसामान्यांच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असतात. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना एकदा खासदारकीची संधी द्या, संधीचे सोने करून दाखवू, असा विश्वास जय पवार यांनी भोरच्या दक्षिण भागात गावभेट दौर्‍यावर असताना खानापूर येथे व्यक्त केला. काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यातील भाबवडी, खानापूर, पोळवाडी, आंबाडे, पळसोशी, वरवडी धावडी, बाजारवाडी या गावांतील मतदारांशी जय पवार व महायुतीतील पहिल्या फळीच्या कार्यकर्त्यांनी संवाद साधला.

या वेळी तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, माजी आदर्श सदस्य चंद्रकांत बाठे, शिवसेना पक्षाचे (शिंदे गट) कुलदीप कोंडे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे, समीर घोडेकर, महिलाध्यक्षा विद्या पांगारे, मनोज खोपडे, अविनाश गायकवाड, सचिन पाटणे, नितीन थोपटे, प्रवीण जगदाळे, राजेंद्र थोपटे, संपत तनपुरे, रोहन भोसले, अनिकेत कोंढाळकर, दत्ता थोपटे, सुनील साळवी, भागातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

जय पवार म्हणाले की, विद्यमान खासदार भोरला औद्योगिक वसाहत आणण्यात अपयशी असून, तरुणांच्या हाताला रोजगार दिला नाही. परंतु, येणार्‍या निवडणुकीत आईला मत देऊन उद्योगाचा प्रश्न सोडविण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन दिले. तसेच, भोर तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम मिळून रोजगार मिळण्यासाठी स्वतः लक्ष घालून औद्योगिक वसाहत प्राधान्याने आणणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT