पुणे

loksabha election | उदयनराजेंचे महामार्गावर ‘चक्का जाम स्वागत’

Laxman Dhenge

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारा दिशेने जात असताना त्यांचे स्वागत करण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली. उदयनराजेंच्या स्वागतासाठी मोठी हारफुलांची कमान असलेल्या दोन क्रेन महामार्गावरच उभ्या केल्याने पुणे-सातारा महामार्गावर तब्बल दीड किलोमीटर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
बुधवारी (दि. 27) उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास निरा नदी पुलाजवळ शिरवळ हद्दीत उभ्या केलेल्या दोन क्रेन, सहा जेसीबी या महामार्गाच्या कडेला उभ्या केल्याने सारोळा येथील नदीपात्र व उड्डाणपुलावर तब्बल दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा सातारा बाजूला लागल्या होत्या.

यात एसटी बस, खासगी वाहने खोळंबली होती. त्यात उन्हाचा तडाखा आणि थांबलेली वाहने, यामुळे प्रवासी हैराण झाले होते.
कार्यकर्त्यांनी उदयनराजे यांचे स्वागत वाहतूक कोंडी होणार नाही, अशा ठिकाणी करण्याची आवश्यकता असल्याचे मत या वेळी प्रवाशांनी व्यक्त केले. उदयनराजे यांच्या काही कार्यकर्त्यांनी मात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. यानंतर वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली होती.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT