प्रतीक्षा संपली! संजय लीला भन्साळींच्या Heeramandi ची रिलीज डेट जाहीर | पुढारी

प्रतीक्षा संपली! संजय लीला भन्साळींच्या Heeramandi ची रिलीज डेट जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : संजय लीला भन्साळींचा ‘हीरामंडी : द डायमंड बाजार’ च्या रिलीज डेटची प्रतीक्षा संपली आहे. (Heeramandi) आता फॅन्ससाठी मोठी अपडेट आहे. वेब सीरीजची रिलीज डेट समोर आली असून एक ग्रँड ड्रोन शोच्या माध्यमातून सीरीजची रिलीज डेटची घोषणा करण्यात आलीय. (Heeramandi)

संजय लीला भन्साळींच्या ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’ची सर्व लोकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. वेब सीरीजची अनेक झलक निर्मात्यांनी आधीच दाखवली आहे. पण, रिलीज डेटच्या विषयी कोणतीही माहिती समोर आली नव्हती. आता ही सीरीज कधी रिलीज होईल, या‍विषयी सोशल मीडियावर #HeeramandiKabReleaseHogi ट्रेंड देखील करत आहे. आता अखेरीस निर्मात्यांनी सीरीजची रिलीज डेटची घोषणा केली आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की, ही मोस्ट अवेटेड वेब सीरीज कधी रिलीज होणार आहे.

रिलीज डेटची घोषणा

नेटफ्लिक्स आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळीने ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’च्या रिलीज डेटची घोषणा केलीय. आणि सांगितलं की, १ मे, २०२४ रोजी वेब सीरीजचे प्रीमियर केले जाईल. संजय लीला भन्साळीच्या ‘हीरामंडी’ची मुख्य अभिनेत्री मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, ऋचा चड्ढा, शर्मिन सहगल आणि संजीदा शेख देखील यावेळी उपस्थित होते. रिलीज डेटच्या घोषणेवेळी एक हजार ड्रोनचा वापर करण्यात आला, जो एक खास क्षण होता.

संजय लीला भन्साळींच्या फॅन्सकडून प्रतिक्रिया

प्रीमीयरच्या डेटची घोषणा करताना दिग्दर्शक संजय लीला भन्साळी म्हणाले, ‘मी संपूर्ण टीमचा आभारी आहे. १ मे रोजी रिलीज करण्यासाठी आम्ही जगभरात प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा करताना दिसेल.’

Back to top button