पुणे

LokSabha Elections | मतमोजणीसाठी सतराशे अधिकारी व कर्मचारी

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांसाठी येत्या 4 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्याकरिता तब्बल 1704 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली. जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून मनुष्यबळ व्यवस्थापन आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 1704 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यानुसार त्यांना मतमोजणीचे टप्पेनिहाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची सरमिसळ (रॅन्डमायजेशन) होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रामुख्याने मतदान यंत्रांच्या मोजणीसाठी 372 टेबलवर 1,660 अधिकारी कर्मचारी संख्या निश्चित करण्यात आली आहे. ऐनवेळी कर्मचार्‍यांना दुसरे काम किंवा दिरंगाई होऊ नये, अडथळा येऊ नये म्हणून निवडणूक विभागाकडून अतिरिक्त 30 टक्के मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेची नोंदणी आणि इतर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देऊन निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत सरमिसळ होऊन मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाईल, अशी माहिती अधिकारी-कर्मचारी नियुक्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वय अधिकारी ज्योती कदम यांनी दिली. प्रथम पोस्टल बॅलेट आणि लष्करी सेवेत असणार्‍या जवानांचे ईटीपीबीएस मतदानाची मोजणी होणार आहे. त्यासाठी चारही लोकसभा मतदारसंघांसाठी मिळून 44 टेबल स्थापन करण्यात आले आहेत.

या ठिकाणी ठेवले आहेत ईव्हीएम…

पुणे, बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे पुणे आणि बारामतीची मतदान यंत्रे कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात, मावळची यंत्रे बालेवाडी क्रीडांगण, तर शिरूरची मतदान यंत्रे रांजणगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आली आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT