पुणे

पुणे रेल्वे स्थानकावर बसणार लिफ्ट : निविदा प्रक्रिया सुरू

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वे स्थानकावर येत्या तीन महिन्यांत प्रवाशांसाठी लिफ्टची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू आहे. यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे. रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांनी अमृत भारत योजनेतील स्थानकांच्या उद्घाटनासंदर्भात शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यांच्यासह या वेळी रेल्वेच्या पुणे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, सहायक वाणिज्य व्यवस्थापक शीलभद्र गौतम व अन्य अधिकारी उपस्थित होते. दुबे म्हणाल्या की, 5 लिफ्ट बसविण्याचे नियोजन आहे. त्यातील 3 लिफ्ट येत्या तीन महिन्यांच्या आत बसविणार आहे. त्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 4-5 दरम्यान लिोकेशन मिळाले आहे.

अमृत भारत योजनेत पुणे विभागातील स्थानकांचे उद्घाटन
अमृत भारत स्थानक योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात पुणे रेल्वे विभागातील देहूरोड, चिंचवड, हडपसर, लोणी, उरुळी, वाठार, लोणंद, सांगली, केडगाव, बारामती आणि कराड स्थानकांचे अपग्रेडेशन आणि विविध 25 ठिकाणी रोड ओव्हर बि—ज/भुयारी मार्ग यांचे बांधकाम, याचा पायाभरणी शुभारंभ व उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 26 फेब—ुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार आहे, असेही दुबे यांनी यांवेळी सांगितले.

पुणे स्थानकातील घुसखोरीचे अतिरिक्त मार्ग बंद

पुणे रेल्वे स्थानक आणि परिसरात घुसखोरी करण्यासाठी पूर्वी अनेक मार्ग होते. ते आता जाळ्या लावून आणि भिंती बांधून बंद केले आहेत. हे मार्ग खुले असल्यामुळे कोणी सहजरीत्या स्थानकात प्रवेश करीत होते. आता ते रोखले जात आहे. तसेच प्रयत्न आता आम्ही घोरपडी यार्डाकरिता देखील करणार आहे, असेही दुबे यांनी सांगितले.

हडपसर टर्मिनल रोड वाइंडिंगबाबत चर्चा…

रेल्वेच्या हडपसर टर्मिनल येथील फीडर सेवा वाढविणे, रस्तारुंदीकरणाबाबत पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करीत आहोत. यासंदर्भातील पत्रे देखील आम्ही दिली आहेत. तसेच, येथील जागा हस्तांतरणाचे काम देखील आमच्याकडून सुरू आहे. जागा हस्तांतरण आणि टर्मिनलचा विकास झाल्यावर आम्ही येथून गाड्या वाढवू, असेही दुबे या वेळी म्हणाल्या.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT