पुणे

Leopard News : अखेर लेंडेस्थळ येथे बिबट्या जेरबंद

Laxman Dhenge

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : पिंपळवंडी येथील लेंडेस्थळ या ठिकाणी 5 मे रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये काम करीत असलेल्या अश्विनी हुळवळे या महिलेवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्या ठिकाणी वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज(दि.10)पहाटेच्या सुमारास एक बिबट्या जेर बंद झाला आहे जेरबंद झालेला बिबट्या नर असून हा बिबट्या त्या महिलेवर हल्ला करणारा नरभक्षक असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाला असल्याने या बिबट्याला माणिकडोह या ठिकाणच्या निवारा केंद्रामध्ये हलवण्यात आले आहे. अशी माहिती वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली.

दरम्यान या ठिकाणी अध्यापही 4/5 बिबटे असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असल्याने त्या बिबट्यांचा शोध घेऊन त्यांना देखील पकडण्यात येणार आहे. तसेच तीन दिवसांपूर्वी काळवाडी या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात रुद्र फापाळे हा आठ वर्षाचा मुलगा ठार झाला आहे. तेथेही वन विभागाने तब्बल 30 पिंजरे नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी लावले आहेत तथापि अद्याप एकही बिबट्या या पिंजऱ्यामध्ये टॅप झालेला नाही. काळवाडी या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी वन वनविभागाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच स्वतः उपवनसंरक्षक अमोल सातपुते आणि सहाय्यक उपवनसंरक्षक अमित भिसे, वनक्षेत्रपाल वैभव काकडे, रेस्क्यू टीम व वन कर्मचारी तळ ठोकून आहेत.

काळवाडी या ठिकाणी बिबट्याने केलेले हल्ल्यात रुद्र फापाळे हा आठ वर्षाचा मुलगा ठार झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता. स्थानिक लोकांच्या आक्रोशाला वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागले होते. यापुढे बिबट्या कुठे दिसल्याची तक्रार आल्यावर तात्काळ दखल घेऊन त्याला पकडण्यासाठी उपाय योजना करू तसेच आमचा कोणताही कर्मचारी हलगर्जीपणा करणार नाही अशी ग्वाही यावेळी उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी स्थानिक नागरिकांना दिली होती. त्यामुळे तणाव निवळला होता.या परिसरात थर्मल ड्रोन कॅमेराच्या साह्याने परिसरातील सर्व बिबटे शोधून त्यांना पकडून आम्ही माणिकडोह निवारा केंद्रामध्ये त्यांना ठेवणार असल्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी "पुढारी"च्या प्रतिनिधी बरोबर बोलताना सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT