हिंजवडी; पुढारी ऑनलाईन: कासारसाई (ता. मुळशी) येथील ग्रामस्थ गुलाब धोंडिबा शितोळे यांच्या गोठ्यातील शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली. शुक्रवार (दि. १ एप्रिल) रोजी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने कासारसाई, कुसगाव परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गुलाब शितोळे व त्यांचे कुटुंबीय कासारसाई-कुसगाव सीमेलगत काशिआई वस्ती येथे राहतात. शुक्रवारी मध्यरात्री उशिराने त्यांच्या घराबाहेरील गोठ्यात सुमारे १० ते १२ शेळ्या बांधलेल्या होत्या. या बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला.
वनविभागाने यापूर्वीच शेतकर्यांमध्ये वन्यजीवांविषयी सलेल्या भीती कमी व्हावी, यासाठी कार्यशाळा आयोजित करून जनजागृती केली होती. मात्र, या भागातील शेतकरी आर्थिक नुकसानीमुळे चिंतेत आहे.
हेही वाचलंत का?