पुणे

Lalit Patil drug Case : नाशिकच्या सोनाराने ललितला दिले 70 लाख

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयातून ललित पाटील पळून गेल्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. पळून गेल्यानंतर त्याला नाशिकच्या एका सोनाराने तब्बल 70 लाखांची मदत केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. गुन्ह्याच्या चौकशीसाठी सोनाराला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ललित पाटील याला पळून जाण्यासाठी भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, प्रज्ञा कांबळे तसचे विनय अर्‍हाना, अर्‍हानाचा चालक दत्तात्रय डोके यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातच त्याला पळून जाण्यासाठी लागणार्‍या पैशाची मदत एका सोनाराने केली. तसेच ड्रग्ज तस्करीतून आलेल्या पैशातून त्याने याच सोनाराकडून कोट्यवधीचे सोने खरेदी केले असल्याचे आता तपासात निष्पन्न होत आहे. त्याने किती वेळा सोने खरेदी केले, याचाही तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे. ललित पाटील ड्रग्ज तस्करीमधील म्होरक्या आहे.

दरम्यान, लेमन ट्री हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये ललितने ड्रग्ज तस्करांची डील केल्याचेही सूत्रांनी सांगितले. विनय अर्‍हाना याने ललितला पळवून लावण्याची व्यवस्था केली होती. तत्पूर्वी ललितला त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी कॅम्प परिसरातील फ्लॅटची व्यवस्थाही विनय अर्‍हाना याने करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT