Pune Municipal Results 2026 Pudhari
पुणे

Pune Municipal Results 2026: काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात फुलले कमळ, भाजप उमेदवार 897 मतांनी विजयी

मतमोजणीदरम्यान तणाव; काँग्रेसच्या कुणाल राजगुरूंचा 897 मतांनी पराभव

पुढारी वृत्तसेवा

कोरगाव पार्क: प्रभाग क्रमांक 13 मधील ( पुणे स्टेशन- जय जवान नगर) मतमोजणी सकाळी साडे दहाच्या सुमारास चालू झाली. दरम्यान प्रवेशद्वारावर पोलिस आणि कार्यकर्त्यांच्या वादविवाद चालू झाले होते. मतपेटीच्या पाचव्या फेरीपर्यंत काँग्रेसचे चारही उमेदवार अधिकचे मतदान घेऊन आघाडीवर होते, मात्र सहावी फेरी सुरू असताना अर्धा तास मतमोजणीची प्रक्रिया थांबविण्यात आली होती.

अखेर सहावी आणि सातवी फेरी संपूर्ण अंतिम निकाल घोषित केला त्यामध्ये भाजपचे निलेश आल्हाट यांना 10,886 मतानी घोषित केले. त्यांनी काँग्रेसचे कुणाल राजगुरू यांचा 897 मतांनी पराभव केला. काँग्रेसचे ब गटातील उमेदवार सुमैय्या नदाफ (15,811) काँग्रेसच्या वैशाली भालेराव (10513) आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (11,777) विजय घोषित करण्यात आले.

दुसऱ्या फेरीअखेर निलेश आल्हाट (2248) दीक्षा एकनाथ गायकवाड( 2013) मयूर गायकवाड (2 हजार 84) कुणाल राजगुरू यांनी (3493) ब गटात श्वेता चव्हाण ( 232), तर सुमया मेहबूब नदाफ यांनी 6026 मते घेऊन विजयी घोडदौड चालू ठेवली होती

क मधून नीलम शाम गायकवाड (2951) तर काँग्रेसच्या वैशाली भालेराव यांनी (3,635) मते मिळवली होत, तर अरविंद शिंदे दुसऱ्या फेरीत 4159 मते मिळाली होती

तिसऱ्या फेरीअखेर कुणाल राजगुरू यांना 4878 तर निलेश अल्हाट यांना ४ हजार 319 हाेती, तर ब गटात सुमया नदाफ यांना 8133 आणि शोभा मेमाणे यांना 4226 हाेती. तिसऱ्या फेरीत नीलम गायकवाड यांनी 3921 तर अश्विनी भोसले यांनी 3 हजार 437 मते घेतली तर काँग्रेसच्या वैशाली भालेराव यांनी 4965 मते घेऊन सर्वाधिक मते घेतली आहे काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी 5928 मते तिसऱ्या फेरी अखेर घेतली होती तर सूर्यकांत निकाळजे यांनी 3744 मते मिळवली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT