Khed Market Committee Chairman Pudhari
पुणे

Khed Market Committee Chairman Election: खेड बाजार समितीच्या सभापतीपदी अशोक राक्षे; रणजीत गाडे उपसभापतीपदी बिनविरोध

आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली निवड प्रक्रिया; राजकीय घडामोडींनंतर बाजार समितीत पुन्हा सत्तेची सूत्रे राक्षे-गाडे यांच्या हाती

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर: पुणे जिल्ह्यात जनावरांचा बाजार आणि भाजीपाला व्यवसायात अग्रगण्य असलेल्या खेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अशोक बबन राक्षे आणि उपसभापती पदावर रणजीत विठ्ठल गाडे यांची बिनविरोध निवड झाली.

शिवसेनेचे (उबाठा) आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.त्यांच्या निवडीच्या घोषणेनंतर समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला. सन २०२३ च्या निवडणुकीत नवनिर्वाचित सभापती अशोक राक्षे आणि उपसभापती रणजीत गाडे हे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पॅनेल मधुन निवडून आले होते. एकूण १८ पैकी मोहिते पाटील यांचे ११ संचालक निवडून येऊन बहुमत सिद्ध झाले होते.त्यांचे समर्थक सभापती कैलास लिंभोरे यांनी पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर सन २०२४ मध्ये बाजार समितीत सत्तांतर झाले. नवनिर्वाचित सभापती अशोक राक्षे यांच्या सह त्यावेळी तीन संचालक विरोधी गटात सामील झाले होते. त्यात अशोक राक्षे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सध्याच्या निवड प्रक्रियेत मावळते सभापती ॲड विजयसिंह शिंदे पाटील यांनी राजीनामा दिला.त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत अशोक राक्षे यांना अडकवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. मात्र त्यावर मात करीत अशोक राक्षे सभापती पदावर विराजमान झाले. या राजकीय घडामोडीत आमदार बाबाजी काळे यांच्या सह मावळते सभापती ॲड विजयसिंह शिंदे पाटील, संजय घनवट यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

दरम्यान, मंगळवारी (दि २८) बाजार समितीच्या राजगुरुनगर येथील मुख्यालयाच्या सभागृहात अध्यासी अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सचिन देशमुख यांनी संचालकांची विशेष बैठक बोलावली होती. त्यात निर्धारित वेळेत सभापती पदासाठी अशोक राक्षे आणि उपसभापती पदासाठी रणजित गाडे यांचे एकमेव अर्ज दाखल झाले होते.

माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि संचालक विनोद टोपे हे अनुपस्थित राहिले. प्रभारी सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी निवडणुक कामकाजात सहभाग घेतला.ॲड विजयसिंह शिंदे पाटील, मावळत्या उपसभापती क्रांती सोमवंशी, संचालक माणिक गोरे, सुधीर भोमाळे, सागर मु-हे, जयसिंग भोगाडे, सोमनाथ मुंगसे, महेंद्र गोरे, कमल कड, कैलास लिंभोरे, अनुराग जैद, सयाजी मोहिते, हनुमंत कड, विठ्ठल वनघरे हे सभागृहात उपस्थित होते. आमदार बाबाजी काळे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका ज्योती आरगडे, निमगावचे माजी सरपंच अमर शिंदे, राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष किरण आहेर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र राक्षे, माजी सभापती सतीश राक्षे,मृगेंद्र काळे, संजय घनवट, सुभाष होले, दत्ता सातपुते , मारुती सातकर,सतीश चांभारे , पोलिस पाटील बाळासाहेब शिंदे, आदींनी सभापती, उपसभापती यांचे अभिनंदन केले.

सन १९९२ पासुन रक्षेवाडी ग्रामपंचायत सदस्य,उपसरपंच, सरपंच म्हणून अशोक राक्षे हे कार्यरत आहेत. सलग दोन पंचवार्षिक मध्ये बाजार समितीचे संचालक आहेत. सन २०१५ - १६ मध्ये उपसभापती म्हणून काम केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT