Kharat Maharaj criticizes Supriya Sule
आळंदी: खासदार सुळे यांनी मांसाहार प्रकरणाच्या वक्तव्यावर माफी मागावी, अन्यथा वारकरी संप्रदाय त्यांच्याविरोधात मोठे आंदोलन उभे करेल, असा इशारा खरात यांनी दिला.
खा. सुळे यांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये आक्रोश आहे. असं वक्तव्य शहाण्या माणसाचं लक्षण नाही. खा. सुळेंनी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावं, यामध्ये कुठेही वारकरी संप्रदायाचा अपमान करू नये. पृथ्वीतलावर एकच विठ्ठल आहे, दोन विठ्ठल नाहीत. त्यामुळे खा. सुप्रिया सुळे यांनी केलेले हे वक्तव्य निषेधार्थ आहे. याचा आम्ही वारकरी पाईक संघाकडून निषेध व्यक्त करतो. (Latest Pune News)
वारकरी संप्रदायातील लोकांनी मद्य आणि मांस यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. याचा कुठेतरी खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून हरताळ फासण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महाराजांनी केला. भगवान विठ्ठल हा सर्वांचाच माता-पिता आहे. भगवान विठ्ठलाने सर्व जीव-जंतू तयार केले आहेत. त्यांची हत्या करून भक्षण करणे, हे त्या मात्या-पित्याला म्हणजेच विठ्ठलाला नक्कीच आवडणार नाही. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य निषेधार्ह आहे.
वारकर्यांच्या पांडुरंगाला बळी दिलेला चालत नाही. त्यामुळे खा. सुप्रिया सुळे यांचा पांडुरंग कोणता आहे, असा प्रश्न महाराजांनी उपस्थित करत या वक्तव्याचा निषेध केला. ’मौस खाता हौस करी जोडूनी वैरी ठेवीला’ या संत वचनानुसार वारकरी संप्रदाय चालतो. या वक्तव्याचा विपर्यास करून खा. सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान निषेधार्ह आहे, असेही ह.भ.प. खरात महाराज म्हणाले.