Ketan Agrawal Case: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर १८ जून रोजी केतनचा दरीत पडून मृत्यू झाल्याची बातमी आली होती. सुरूवातीला हे एक अपघात वाटणारं प्रकरण कट करून खून करण्यापर्यंत पोहचलं. गर्भ श्रीमंत लोकांबाबत ही केस असल्यानं ती हाय प्रोफाईल झाली. या केसबाबत दिवसेंदिवस गुढ वाढत आहे. घटनास्थळावर फक्त तीन व्यक्ती उपस्थिती होत्या. एक म्हणजे केतन अग्रवल, त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि सियाचा मित्र चेतन चौधरी!
या प्रकरणात पोलिसांना सिया आणि चेतनने केतनला दरीत ढकलून त्याचा खून केल्याचा संशय आहे. पोलिस त्या अँगलने चौकशी देखील करत आहेत. मात्र या प्रकरणामध्ये अजून तरी कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळालेला नाहीये. त्यामुळं आता पोलिसांसमोर जर प्रत्यक्षदर्शी साक्षीदारच नसेल तर या मर्डर मिस्ट्रीचे सत्य कोण सांगणार असा मोठा प्रश्न आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी हा गुन्हा घडला त्यावेळी त्या ठिकाणी कोणी प्रत्यक्षदर्शी नव्हतं. म्हणजे घटनास्थळी फक्त सिया चेतन आणि केतन या तीन व्यक्तीच होत्या
पुणे पोलिसांच्या तपासानुसार ज्यावेळी लोहगडावर ही घटना घडली त्यावेळी या ठिकाणी स्वतंत्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपस्थित होता याची पुष्टी झालेली नाही. पोलिसांच्या दाव्यानुसार घटना घडली त्यावेळी तिथं आसापास फक्त सिया, केतन आणि चेतन हे तीन लोक होते. त्यामुळं हे सामन्य हत्याप्रकरणापेक्षा हे प्रकरण वेगळं आहे. यात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. मात्र या प्रकरणात तपासाची भिस्त ही परिस्थितीजन्य पुराव्यांवर आहे.
२३ जून रोजी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी कोर्टात प्रथमदृष्ट्या हा कट रचून केलेली हत्या वाटते. या आधारावर या दोघांसाठी पोलिसांनी पोलीस कोठडी मागितली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तपास आणि डिजीटल पुरावे आणि घटनास्थळावरील तपास या पूर्ण घटनाक्रमांची साखळी जोडणे गरजेचे आहे. यानंतर कोर्टाने पोलीस कोठडी दिली.
पोलिस कोठडीदरम्यान अनेक अंगाने तपास करण्यात आला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकाने दोन्ही आरोपींचा मोबाईल फोन तपासल असून कॉल डिटेल रेकॉर्ड आणि डिजीटल डेटाचे विश्लेषण करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मोबाईलमधून मिळालेले व्हिडिओ आणि इतर डिजीटल सामुग्रीची देखील तपासणी केली. तपासात मिळालेल्या इनपुटच्या आधारे घटनाक्रमाची तपासणी केली. त्याचबरोबर सियाच्या आई-वडील आणि भावाचा देखील चौकशी करण्यात आली. क्राईम रिक्रिएशन देखील करण्यात आलं.
गुन्हेगारी प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महत्वाचा मानला गेला आहे. मात्र भारतीय कायद्यानुसार फक्त प्रत्यक्षदर्शी साक्षीदारावर अवलंबून राहता येत नाही. जर परिस्थितीजन्य पुरावे सर्व डॉट कनेक्ट करत असतील. इथर कोणती तार्किक संभावना नसेल तर न्यायालय अशा प्रकरणात आरोपींना दोषी ठरवू शकते. म्हणजे एखाद्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसला तरी आरोपी निर्दोष सुटत नाही.
सर्वोच्च न्यायालयाचे वकील फुजैल खान यांनी दिलेल्या माहितीनुसार एखाद्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसण्याने आरोपी वाचणार असं होत नाहीये. कोर्ट पोलिसांनी अशा प्रकरणात परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक विश्वसनीय पुरावे गोळा केले असतील आणि ते जर गुन्हा घडला आहे आणि हा आरोपींनीच केला आहे हे प्रस्थापित करण्यात यशस्वी होत असतील तर कोर्ट प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना देखील कायदेशीर आधारावर आपला निर्णय देऊ शकते.