Fetal Determination Pudhari
पुणे

Kedgaon Fetal Determination Racket Investigation: केडगाव गर्भलिंगनिदान रॅकेटचा तपास विस्तारला; आणखी तीन आरोपींची नावे उघड

मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी व डॉक्टर साथीदाराची पोलिस कोठडी वाढली; फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना

पुढारी वृत्तसेवा

केडगाव: दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात उघडकीस आलेल्या गर्भलिंगनिदान-गर्भपात प्रकरणाच्या तपासात दररोज नवे धागेदोरे समोर येत असून, या गुन्ह्यात आणखी तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी आणि त्याचा डॉक्टर साथीदार अतुल जाधव यांना न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

यवत पोलिसांनी गर्भलिंग निदान रॅकेटचा मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या अण्णासाहेब गिरी याला अटक केल्यानंतर तपासाची व्याप्ती वाढली होती. पोलिस कोठडीत गिरी याची कसून चौकशी करण्यात आली असता, या अवैध रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आणखी काही व्यक्तींची माहिती समोर आली. त्यानुसार यवत पोलिसांनी या प्रकरणातील आणखी दोन डॉक्टर आणि गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात आलेले सोनोग््रााफी मशिन पुरवणाऱ्या व्यक्तीचा शोध लावला आहे.

तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भलिंगनिदानासाठी वापरण्यात येणारे मशिन आरोपी गिरी याला नरेंद्र ठाकरे याने उपलब्ध करून दिले होते. नरेंद्र ठाकरे सध्या अन्य एका प्रकरणात कारागृहात असल्याचे समोर आले आहे. तसेच या रॅकेटमध्ये डॉ. मंदार माळी (रा. किकवी, ता. भोर) आणि सुंदरम कदम (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) या दोघांचीही नावे निष्पन्न झाली आहेत. मात्र, हे दोघेही सध्या फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

या नव्या घडामोडींमुळे गर्भलिंगनिदान प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. पोलिसांच्या तपासात या रॅकेटचे जाळे दौंड तालुक्यापुरते मर्यादित नसून इतर तालुक्यांपर्यंत विस्तारले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी आणि डॉ. अतुल जाधव यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी कोठडी वाढीची मागणी केली. ती ग््रााह्य धरत न्यायालयाने दोघांनाही पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

या प्रकरणाचा तपास यवत पोलिस करीत असून, फरार आरोपींचा शोध, आर्थकि व्यवहारांची चौकशी आणि गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात आलेल्या यंत्रसामग््राीचा उगम याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT