prostitution racket crime case Pudhari
पुणे

Pune Crime: कात्रजमधील लॉजवर पोलिसांचा छापा; देहव्यापारातून परराज्यातील दोन तरुणींची सुटका

व्हॉट्सॲपवर फोटो पाठवून ग्राहकांना आमिष; बनावट ग्राहकाच्या मदतीने भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई, दलाल अटकेत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कात्रज परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या देहव्यापारावर भारती विद्यापीठ पोलिसांनी छापा टाकून परराज्यातील दोन तरुणींची सुटका केली. याप्रकरणी देहव्यापारासाठी मुलींचा पुरवठा करणारा दलाल तुकाराम दत्ता मनाळे (वय २२, रा. सध्या तीन हत्ती चौक, संभाजीनगर, धनकवडी; मूळ रा. किल्लारी, ता. निलंगा, जि. लातूर) याला अटक करण्यात आली असून, त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज भागातील एका लॉजमध्ये व्हॉट्सॲपच्या माध्यमातून महिलांचे फोटो पाठवून ग्राहकांना आमिष दाखवले जात असल्याची गोपनीय माहिती भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून सापळा रचला. दलाल तुकाराम मनाळे याच्याशी संपर्क साधल्यानंतर त्याने ग्राहकांना कात्रजमधील संबंधित लॉजमध्ये बोलावले. ठरलेल्या ठिकाणी व्यवहार निश्चित होताच पोलिसांच्या पथकाने तातडीने छापा टाकला. कारवाईदरम्यान लॉजमधून परराज्यांतील दोन पीडित तरुणींची सुखरूप सुटका करण्यात आली.

त्यानंतर पीडित महिलांकडे चौकशी करून तुकाराम मनाळे व त्याच्या साथीदारांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक व देहव्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, अंमलदार राहुल शेडगे, सचिन सरपाले, नीलेश खैरमोड, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांच्‍या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT