कात्रज: कात्रज- सारोळा पीएमपी बस कात्रजकडे येत असताना भिलारेवाडीमध्ये उतार रस्त्यावर दुचाकीचा गंभीर अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून सुदैवाने एकाचे प्राण वाचले आहेत.
आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि.14) सकाळी 8.40 वाजण्याच्या सुमारास जुन्या कात्रज घाटात भिलारेवाडीजवळील वळणाजवळ पीएमटी बस (क्र. एमएच 14 एचयू 6432) हिने दुचाकी (क्र. एमएच12 एफबी 0348)ला मागून जोरात धडक दिल्याने अपघात झाला. (Latest Pune News)
सदर अपघातात दुचाकीवरील आकाश रामदास गोगावले (वय 29) व अनुष्का प्रकाश वाडकर (वय 27) हे मयत झाले. तर नेहा कैलास गोगावले (वय 20, तिघेही रा. ससेवाडी, ता. भोर, पुणे) या जखमी आहेत. जखमीवर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
तसेच, पीएमटीचे चालक सुधीर दिलीप कोंडे (वय 42, रा. आर्वी, पुणे) यास ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणी कामी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून आंबेगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने हे सहकार्यांसह घटनास्थळी हजर होते. त्यांनी यावेळी वाहतूक सुरळीत केली.