कात्रज: न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, शनिवार पेठ, पुणे येथे शिक्षण घेत असलेला होतकरू फुटबॉलपटू करण नितीन भूतकर याची महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ‘महादेवा’ या ग््राासरूट्स फुटबॉल विकास योजनेसाठी निवड झाली असून, ही कात्रजसह पुण्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
प्रोजेक्ट महादेवा हा उपक्रम महाराष्ट्र सरकारच्या वतीने चखढठअ, उखऊउज आणि थशीींशीप खपवळर ऋेेींलरश्रश्र अेीीलळरींळेप ( थखऋअ) यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असून, 14 वर्षांखालील मुलांमधील फुटबॉलकौशल्य शोधून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा उद्देश या योजनेमागे आहे.
या प्रकल्पांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून 30 मुले व 30 मुली यांची निवड करण्यात आली असून, निवड झालेल्या खेळाडूंना 5 वर्षांची पूर्ण शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या शिष्यवृत्तीत व्यावसायिक प्रशिक्षण, शैक्षणिक साहाय्य, क्रीडासाहित्य, पोषण आहार तसेच मानसिक कंडिशनिंग यांचा समावेश आहे.
या योजनेचा शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम 14 डिसेंबर 2025 रोजी वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी राज्य व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. करण भुतकर वयाच्या अवघ्या 3 वर्षांपासून फुटबॉलचा सराव करत असून, रमणबाग शाळेच्या मैदानावर टायगर्स कंबाईन या क्लबमध्ये त्याने वडील नितीन भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली फुटबॉलचे धडे गिरवले.
सध्या तो स्पोट्र्स मेनिया क्लबमध्ये सराव करत आहे. करणने मागील वर्षभरात ख- ङशरर्सीश (ज्युनिअर), पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र स्तरावरील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीची दखल घेत त्याची प्रोजेक्ट महादेवासाठी निवड करण्यात आली आहे. करणच्या या यशामुळे कात्रज परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत असून, शाळा, प्रशिक्षक, मित्रपरिवार तसेच क्रीडाप्रेमींनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. करण भविष्यात भारतीय फुटबॉलमध्ये उज्वल कारकीर्द घडवेल, असा विश्वास राजस सोसायटीचे चेअरमन हेमंत धायबर यांनी व्यक्त केला आहे.