पुणे

कामशेत पोलिसांनी केली अल्पवयीन मुलीची सुटका

अमृता चौगुले

कामशेत : औरंगाबाद येथून अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. ओंकार खाडे (रा. वाळुंज, औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. लोणावळा विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना कामशेतजवळील चिखलसे हद्दीत एका सोसायटीमध्ये अल्पवयीन मुलीला पळवून आणल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतर त्यांनी याची माहिती कामशेत पोलिस ठाण्याला दिली. त्यानुसार कामशेत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, हवालदार गणेश तावरे, अमोल ननवरे, होमगार्ड लोखंडे यांच्या पथकाने चिखलसे येथील सोसायटीमध्ये पाहणी केली असता, सोसायटीच्या पार्किंगमध्ये स्विफ्ट कारमध्ये अल्पवयीन मुलगी व संशयित व्यक्ती आढळली.
संबंधित मुलीचे औरंगाबाद येथून अपहरण करण्यात आले होते. संतोष कांबळे फरार असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ओंकार खाडे याला अटक करण्यात आली आहे.

मुलीच्या वडिलांनी वाळुंज पोलिस ठाण्यात दिली होती फिर्याद
या संदर्भात अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी वाळुंज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी कार औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास कामशेत पोलिस करत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT