Junnar ZP PS Election Pudhari
पुणे

Junnar ZP PS Election: जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक; 7 फेब्रुवारीला मतदान

366 मतदान केंद्रांवर 3 लाखांहून अधिक मतदारांचा कौल; प्रशासन सज्ज

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव: जिल्हा परिषद व पंचायत सामितीच्या निवडणुकीसाठी जुन्नर तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषद गट व 16 पंचायत समिती गणामध्ये शनिवारी (दि. 7) सकाळी 7.30 ते सांयकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे.

मतदानासाठी तालुक्यात पुरुष मतदार 1 लाख 55 हजार 846 व स्त्री मतदार 1 लाख 51 हजार 409 तसेच इतर 5 असे एकूण 3 लाख 7 हजार 260 मतदार असून, मतदानासाठी एकूण 366 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्निल मोरे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनील शेळके यांनी दिली.

या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान केंद्र अध्यक्ष 406, मतदान अधिकार क्र. एक 406, मतदान अधिकारी क्र. दोन 406, मतदान अधिकारी क्र. तीन 406, शिपाई कर्मंचारी 406, पोलिस कर्मचारी 366 अशी एकृण 2 हजार 396 कर्मंचार्‌‍यांची, तसेच मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी 35 क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती करणेत आलेली आहे.

मतदान अधिकारी व कर्मंचारी यांना मतदानाचे अगोदरचे दिवशी शुक्रवारी (दि. 6) श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट यात्री निवास भाग क्र. 2 येथे मतदान साहित्य वाटप केले जाणार आहे. मतदान साहित्य वाटपासाटी एकूण 35 टेबल ठेवण्यात आले. मतदान संपल्यानंतर मतदान साहित्य परत जमा करून घेण्यासाठी देखील 35 टेबल टेवण्यात आलेले आहे, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनील शेळके यांनी सांगितले.

मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक तेथे पुरेसा पोलिस बंदोबस्त नियुक्त करण्याबाबत पोलिस विभागला सूचना देण्यात आलेल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT