Tomato Price Pudhari
पुणे

Junnar Tomato Price: टोमॅटोचे दर कोसळले; जुन्नरच्या शेतकऱ्याने १४ एकरांतील बाग उपटण्यास सुरुवात केली

किलोमागे केवळ ८ ते १० रुपये भाव; उत्पादन खर्चही निघेना, लाखोंचा खर्च वाया जाण्याची भीती

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव: टोमॅटोचे बाजारभाव घसरल्याने जुन्नर तालुक्यातील उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने बल्लाळवाडी येथील शेतकरी सुधीर घोलप यांनी कुटुंबाच्या १४ एकर क्षेत्रांतील टोमॅटोची बाग काढण्यास सुरुवात केली आहे.

सध्या टोमॅटोला किलोमागे ८ ते १० रुपये दर मिळत आहे. लागवड, खते, औषधे, मजुरी, पाणी, तोडणी आणि वाहतुकीचा खर्च पाहता या दरात उत्पादन खर्च भरून निघणेही कठीण झाले आहे.

घोलप यांनी १४ एवार क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, बाजारभाव कोसळल्याने त्यांनी बाग काढम्याचा निर्णय घेतला, बाग उपहम्यासाठी एकरी १७ हजार रुपये मजुरी की लागत असून, एकूण सुमारे अद्रीय लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

जुन्नर तालुक्यात टोमॅटोची एक एकर बाग उभी करुयासाठी तीन ते साडेतीन लाख रुपफी खर्च येतो. घोलप म्हारे की मी दर वर्षी रोमॅटोची लागवड करतो. यापूर्वी या विकातून लाखो रुपयांचे उत्पन मिळाले आहे. मात्र, सध्या अत्पादन खाईही वसूल होत नसल्याने हतबल होऊन बाग उपटण्याचा निर्णय घेतला.

इतर राज्यांतील आवकेचा परिणाम

टोमॅटो व्यापारी सारंग घोलप यांनी सांगितले की, इतर राज्यांतून टोमॅटोची आवक वाढली आहे. जुन्नर तालुक्यात जुलै महिन्यात अतिवृष्टीसदृश परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाले होते. सध्या नारायणगाव बाजारपेठेत गावठी टोमॅटोला २० किलोच्या क्रेटमागे ४०० ते ५०० रुपये दर मिळत आहे. टोमॅटोचा प्रकार, दर्जा आणि मागणीनुसार दरात फरक पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT