Pune Police Security: पुण्यातील २० अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची पोलिस सुरक्षा हटवली; विद्यानंद बापट यांचाही समावेश

पोलिस संरक्षण समितीच्या आढाव्यानंतर निर्णय; उद्योजक राणा सूर्यवंशी यांची वाय-प्लस एस्कॉर्ट सुरक्षा कायम
Vidyanand Bapat
Vidyanand BapatPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुणे शहरातील २० महत्त्वाच्या व्यक्तींना पुरवण्यात आलेली पोलिस सुरक्षा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, राजकीय विश्लेषक आणि चित्रपट निर्मात्यांचा समावेश आहे. ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेले विद्यानंद बापट यांचेही पोलिस संरक्षण हटवण्यात आले आहे.

Vidyanand Bapat
Pune Sanitation Workers Protest: पुण्यात सफाई कामगारांचा आक्रोश मोर्चा; दिवाळीपूर्वी प्रोत्साहनभत्ता देण्याची मागणी

मात्र, बारामतीत हल्ला झाल्याच्या घटनेनंतर चर्चेत आलेले उद्योजक राणा सूर्यवंशी यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली असून, त्यांना वाय-प्लस एस्कॉर्ट दर्जाचे संरक्षण दिले जात आहे. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या वतीने पोलिस संरक्षण पुरवण्यात आलेल्या व्यक्तींच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला.

Vidyanand Bapat
Pune FDA Action: दिवाळीच्या फराळावर FDA ची धडक! पुण्यात ८७.६ किलो अनारसे जप्त

यासाठी २३ ऑक्टोबरला पोलिस संरक्षण समितीची बैठक झाली. संबंधित व्यक्तींना सध्याच्या परिस्थितीत पोलिस संरक्षणाची आवश्यकता आहे का? याची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर २० जणांची सुरक्षा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सवापूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला होता.

Vidyanand Bapat
Pune Water Cut: पुणेकरांना दिलासा! तूर्तास पाणीकपात वाढणार नाही; ४.८६ टीएमसी पाणी कमी

त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना २४ तास सुरक्षा पुरवली होती. मात्र, अलीकडे झालेल्या आढाव्यानंतर त्यांना पोलिस संरक्षणाची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. शहरातील महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा देण्याचा अधिकार पोलिस आयुक्तांना असतो. त्यानुसार त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्याकडून संबंधितांचा आढावा घेतला जातो.

Vidyanand Bapat
Junnar Burglary Case: सीसीटीव्हीच्या मदतीने आंतरजिल्हा घरफोडी टोळीचा पर्दाफाश; ३८.५० लाखांचा ऐवज जप्त

त्यानुसार कोणाला सुरक्षा द्यायची, कोणाची सुरक्षा काढायची, याचा निर्णय दर दोन महिन्यांनी होणार्‍या बैठकीत घेतला जातो. त्यानुसार दि. २३ ऑक्टोबरला पुणे पोलिसांच्या विशेष शाखेची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये पुण्यातील २० जणांची सुरक्षा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news