पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचे नेहरूनगर, पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडिमय मैदानावरील 800 ऑक्सिजन बेडचे जम्बो रूग्णालय बंद करून ते हटविण्याचे काम सुरू आहे.
तेथील बेड यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयांसह इतर रुग्णालय व दवाखान्यात हलविण्यात येणार आहे. तेथे त्याचा वापर होणार आहे.
कोरोना महामारीत रुग्णांना बेड कमी पडू लागल्याने पीएमआरडीए, जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेच्या माध्यमातून नेहरूनगरच्या अण्णासाहेब मगर स्टेेडिमय मैदानावर 800 बेडचे जम्बो रुग्णालय उभारण्यात आले.
त्याचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 25 ऑगस्ट 2020 ला झाले. पहिला व दुसर्या लाटेत जम्बो रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले गेले. तिसर्या लाटेसाठी जम्बो रुग्णालय तयार ठेवण्यात आले. रुग्ण संख्या आटोक्यात असल्याने तेथे एकही रुग्ण दाखल करण्यात आला नाही.
रुग्ण संख्या घटल्याने तसेच, महापालिकेचे आकुर्डी, थेरगाव, जिजामाता व भोसरी असे चार मोठे रूग्णालय कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे जम्बो रुग्णालय 28 फेबु्रवारीनंतर कायमचे बंद केले.
व्हेंटिलेटर, सिटी स्कॅन, एक्स रे मशिन, डॉयलिसीस, ऑक्सिजन प्लँट आदी वैद्यकीय यंत्रसामुग्री पालिकेच्या रुग्णालयात हलविण्यात आल्या आहेत. तेथे 800 ऑक्सिजन बेड आहेत.
वायसीएम रुग्णालय हे 750 बेडचे आहेत. तेथील खराब व नादुरूस्त बेड काढून तेथे जम्बोतील बेड ठेवले जाणार आहेत. तसेच, पालिकेचे विविध रुग्णालय व दवाखान्यात खराब व नादुरूस्त बेडच्या जागी हे बेड दिले जाणार आहेत.
नव्या रूग्णालयात उपलब्ध जागेत बेड ठेऊन त्याची बेडची क्षमता वाढविली जाणार आहे. तसेच, पालिकेच्यिमयवर खेळाडूंच्या निवार्यासाठी, वसतीगृह, सांस्कृतिक केेंद्र, सभागृह, रात्र निवारा केंद्र या ठिकाणी गरजेनुसार बेडचे वितरण केले जाणार आहे.
कोरोना महामारीत मोठ्या संख्येने रुग्ण वाढल्याने महापालिकेने चिंचवडच्या ऑटो क्लस्टर येथे 200 ऑक्सिजन बेडचे तात्पुरते रूग्णालय सुरू केले होते.
महापालिकेने नियुक्त केलेल्या स्पर्श रुग्णालयाच्या वतीने तेथे पहिल्या व दुसर्या लाटेत रूग्णांवर उपचार करण्यात आले. दुसरी लाट ओसरताना ते बंद करण्यात आले. तेथील वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य अद्याप आहे तशी आहे.
ते साहित्यही पालिकेच्या इतर रुग्णालय व दवाखान्यात हलविले जाणार आहे, असे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.